
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर–
वारंवार मागणी करूनही शेतीसाठी आवश्यक नवीन पोल व नवीन डीपी न बसवणे, नादुरूस्त डीपीचे मेंटनन्स न करणे व शेतकऱ्यांना योग्य प्रतिसाद न देणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करण्याच्या मागण्यांसाठी देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी नेते कैलास येसगे कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून आक्रमक शेतकऱ्यांनी कार्यालयात घूसत उपकार्यकारी अभियंता बनसोडे यांना घेराव घातला. रब्बी हंगाम तोंडावर असल्याने रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना दिवसा व पूर्णवेळची वीज उपलब्ध करून द्यावी, नादुरूस्त डीपींची दुरूस्ती करून सुरळीत वीजपुरवठा करावे, कामचुकार कर्मचाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करून त्यांची तात्काळ बदली करावी या मागण्या शेतकऱ्यांकडून आक्रमकपणे मांडण्यात आल्या. कार्यकारी अभियंता चेटलावर यांच्याशी भ्रमनध्वनीवर व्यवस्थित बोलणे झाल्यावर व मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पुढील आठ दिवसात वरील मागण्यांबाबत योग्य कार्यवाही झाली नाही तर महावितरणच्या मुख्य कार्यालयाला कुलूप घालून यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कैलास येसगे कावळगावकर यांनी दिला.
यावेळी सुभाष पाटील, गंगाधर हेड्डे, दत्तात्र्य देशमुख ढोसणीकर, हाणमंत पाटील, विष्णू पाटील, गंगाधर आऊलवार, बसवंत पटणे, मच्छिंद्र गवाले, सरपंच आनंदा राजूरे, मिलींद कावळगावकर, संतोष मनधरणे, नरेश राचलवार, शिवराज गोपछडे, किरण बिरादार, मारोती कारेगावे, मारोती पाशमवार, दिलीप पाटील, शिवप्पा स्वामी, बालाजी पाटील, शिवकांत धनूरे, गणेश मुंडकर, पिराजी शेळगावकर, मधूसुदन आवटी, नामदेव कायतवाड सह मोठ्या संख्येने शेतकरी व तरूण उपस्थित होते.