
दैनिक चालू वार्ता पेठवडज सर्कल प्रतिनिधी -आनंदा वरवंटकर
वरवंट :- कंधार तालुक्यातील वरवंट व राहटी येथील सेवा सहकारी सोसायटी संयुक्त असून संचालक मंडळाची मासीक सभा (मिटींग) पार पडली.या मिटींगमध्ये सर्व सभासदांच्या अडी अडचणी काय आहेत त्या पुर्ण करण्यासाठी सर्व संचालक मंडळींची चर्चा झाली.आणि त्या सर्व पुर्ण करण्यासाठी एकमताने मंजूर करून सभासदांच्या सहकार्याने सेवा सहकारी सोसायटी संयुक्त राहटी /वरवंट कशी स्वयपुर्ण करता येईल याची सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन चेअरमन विश्वंभरराव वरवंटकर, लक्ष्मण कौसल्यें(व्हा.चेअरमन) निवृत्ती कौंसल्यें, बालाजी कौसल्यें, आनंदा धोपटे,सौ.सुरेखाताई कौंसल्यें,सौ.चांगूनाबाई देशमुख, मोहन कौंसल्यें, आनंदा कौंसल्यें,निळबा डाके, एकनाथ वाघमारे, वैजनाथ पाटील हे सर्व संचालक मंडळ मासीक सभेला (मिटिंगमध्ये) उपस्थित होते.