
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे…
मंठा परतीच्या पावसाने हैराण नंतर दिवाळी पाडवा भाऊबीज सणामुळे खरीपाच्यापिकाच्या मळणीला उशीर झाला.कापूस वेचणीला मजुराची कमतरता, या कारणाने रब्बी हंगाम पेरणी दोन आठवडे उशिरा. पशुधन कमी झाल्या कारणाने पारंपरिक तिफण पेरणी कमी प्रमाणात दिसत आहे व वेळे अभावी जमिनीची ओल निघून जाईल या भीतीने शेतकरी ट्रॅक्टरद्वारे पेरणीकडे कल पाहवयास मिळत आहे. ट्रॅक्टर पेरणीसाठी एक हजार ते बाराशे रुपये एकरीखर्च येत आहे पण पेरणी लवकर होत आहे.तिफन पेरणीसाठी मजुरास पाचशे रुपये मजुरी व रासणीवाल्या मजुरास तीनसे रुपये मजुरी द्यावी लागत आहे.तिफणीवरील पेरणी दिवसात दोन ते अडीच एकर शेताची पेरणी होते. शाळु , गहू, हरभरा,सोबत काही शेतकरी सोयाबीन पेरत आहेत. गहू, हरभरा बियाणे नामांकित कंपनीचे खरीदी चालू आहे आणि दगडी शाळू ज्वारी घरचीच पेरत आहे.