
दैनिक चालू वार्ता परभणी उपसंपादक – दत्तात्रय कराळे
ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक चालू वार्ता या मराठी दैनिकाचे परभणी जिल्हा उपसंपादक दत्तात्रय वामनराव कराळे यांचे चिरंजीव ॲड. विशाल कराळे यांचा शुभ विवाह चि.सौ.कां. कोमल (बी.कॉम.) यांच्याबरोबर नुकताच थाटामाटात संपन्न झाला.
या प्रित्यर्थ आयोजित श्री सत्यनारायण महापूजा व स्नेह भोजन समयी परभणीचे शिवसेना खासदार मा.संजयजी जाधव, उद्योजक पंडितराव-मोहिते पाटील, उद्योजक तथा शिवसेना पदाधिकारी उद्धवराव मोहिते-पाटील, परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष दिलीप अवचार, कॉंग्रेसचे नेते सुरेश काळे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रामप्रसाद रणेर, सिव्हील इंजिनिअर दत्तात्रय मुकुंद कराळे, सधन शेतकरी तथा प्रतिष्ठित व्यक्ती ज्ञानेश्वर कदम, उद्योजक अमीत काळे, धनराज कराळे, व्यावसायिक श्रीकांत देशमुख, वासुदेव अग्रवाल यांच्यासह अनेक व्यापारी, उद्योजक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रांतील अनेक नामवंत मंडळींची उपस्थिती लाभली होती. कारेगाव रोडवरील द्वारका नगरी व परिसरातील सर्व रहिवासी बांधव, आप्तेष्ट व हितचिंतक, पत्रकार, डॉक्टर्स, वकील मंडळींनी सुध्दा आवर्जून उपस्थिती देऊन वधू-वरांना आशीर्वाद प्रदान केले.