
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
मी लोकशाहीला मानणारा आहे विरोधकांच्या टीकेला विकास कामातून उत्तर देईल व आमचे नेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या माध्यमातून लोहा शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणणार असे प्रतिपादन लोहा न.पा.चे कर्तव्यदक्ष लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी दीपावली निमित्त पत्रकार स्नेह मिलन कार्यक्रमात केले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोहा न.पा. चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या वतीने त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात लोहा शहरातील पत्रकार बांधवांसाठी दीपावली निमित्त स्नेह मिलन व चहा पाण्याचा कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते.
यावेळी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, ज्येष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, गटनेते करीम भाई शेख, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, नगरसेवक संदीप दमकोंडवार, नगरसेवक केतन खिल्लारे, नगरसेवक नबीसाब शेख, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक जीवन चव्हाण, डॉ.मोटे, उद्योजक माधव पाटील फाजगे, बालाजी आईनवाडीकर, संजय चव्हाण ,राजीव भाऊ नाकेलकर, गुलाम नबी, यांच्यासह लोहा येथील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी प्रथम दिनांक ७ नोव्हेंबर विद्यार्थी दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर लोहा येथील सर्व पत्रकार बांधवांचा नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या वतीने दोस्ती टोपी घालून व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्य मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी बोलताना पुढे म्हणाले की, राज्यात आमची मागील काळात सता नसताना देखील लोहा शहराच्या विकासासाठी मी ४ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. लोहा शहरातील सर्व भागात विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात केले आहेत. मागील पाच वर्षाचा काळ बघा व आताच्या चार वर्षाचा कालावधी बघा शहरात विकास कामे किती झाले आहेत हे तुम्हाला दिसतील.
आता आमची राज्यातही सत्ता आली असल्यामुळे आमचे नेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून लोहा शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणूत.
लोकशाही आहे आणि मी लोकशाहीला मानणारा आहे. कुणी माघाऱ्या किंवा सोशल मीडियाद्वारे टीका केल्याने काही होत नाही. आमचे सूर्यवंशी घराणे काही बदनाम होत नाही. मागच्या निवडणुकीच्या वेळेस आमचा प्रचार उशिरा सुरू होऊन देखील जनतेने आमच्या बाजूने कौल दिला आहे. जनता जागरूक आहे टिकाकारांना व विरोधकांना वेळ व काळ सांगेल जनता त्यांची जागा दाखवेल.
सायाळ रोड येथे सिमेंट काँक्रीटचे रस्ते केले आहेत, नाली बांधकाम केले, डॉ.आंबेडकर नगर इंदिरानगर, शिवकल्याण नगर कलाल पेठ जुना लोहा सर्वत्र विविध विकास कामे केली आहेत सौर ऊर्जेचे पथदिवे बसवले आहेत पाणीपुरवठा स्वच्छता आदी विविध विकास कामे केले आहेत .
तसेच लोहा शहरातील बेघर नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून १३०० घरकुल मंजूर केली आहेत त्यांचा डी पी आर आला आहे व लवकरच या घरकुलाच्या कामाचे उद्घाटन होईल,
तसेच लोहा येथील सर्व पत्रकार बांधवांनी आमच्या लोहा न.पा. ला सहकार्य केले आहे चांगल्या विधायक कामाच्या बातम्या लावल्या आहेत यापुढे आम्हाला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो असे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी म्हणाले.
तसेच यावेळी जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले ,जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे , पत्रकार डी. एन कांबळे, पत्रकार बालाजी धनसडे, पत्रकार विलास सावळे ,यांची ही भाषणे झाली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार मुर्तुझा शेख यांनी केले तर आभार पत्रकार पत्रकार इमाम लदाफ यांनी केली मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार बाळासाहेब कतुरे , पत्रकार केशव पाटील पवार, नगरसेवक अमोल व्यवहारे, केतन खिल्लारे यांनी परिश्रम घेतले.