
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा : – धावरी येथील युवकाने आपल्या जन्मदिनी कुठल्याच प्रकारचा अनावश्यक खर्च न कराता आपला वाढदिवस हा लोहा येथील सावित्रीबाई फुले शिशुगृह व पाळणा गृह लोहा या ठिकाणी अनाथ मुलांना अन्नदान करून व उन्नतीशील महिला मंडळ संचलित राजीव गांधी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र लोहा येथे मार्गदर्शन करून आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला. सध्याचा तरुण हा व्यसनाधीन झाला असुन त्यांनी कसल्याच प्रकारचे व्यसन न करता आपला वाढदिवस हा सामाजिक शैक्षणिक कार्यात सहभाग नोंदवुन साजरा करावा असे आव्हान संतोष काळे यांनी केले
यावेळी या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला व अन्नदान करताना सावित्रीबाई फुले शिशुगृह पाळणा गृहचे संचालक श्री रविशंकर कापुरे सर शिवशंभ पाटील कदम प्रहार संघटनेचे तालुका युवक तालुकाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते गोविंद पाटील वडजे शिवमुद्रा सेवाभावी सहकारी संस्थेचे संचालक नंदाजी पाटील इंगळे योगेश कदम काशिनाथ गायकर आकाश पवार गणेश पवार संदीप एरंडे आदी उपस्थिती होती.