
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा कांग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा राहुल गांधी यांनी देशभरात पायी चालत भारत जोडो यात्रा काढली आहे या यात्रेला जनतेचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या यात्रेचे तेलंगणा राज्यातून महाराष्ट्र राज्यातील देगलूर येथे 7 नोव्हेंबर रोजी रात्री आगमन झाले या यात्रेच्या स्वागतासाठी राज्यभरातून लाखो जनता कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते या यात्रेच्या स्वागतासाठी औरंगाबाद येथून औरंगाबाद जिल्हा कांग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मा आमदार डा कल्याण काळे कांग्रेस चे शहर जिल्हा अध्यक्ष युसूफ भाई शेख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक किरण पाटील डोंणगावकर, जिल्हा प्रवक्ते डा पवन डोंगरे , युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव गौरव जयस्वाल, जिल्हा महासचिव अनिस पटेल, ओबीसी जिल्हा अध्यक्ष अतिस पितळे ,मानव अधिकार जिल्हा अध्यक्ष कैंसर बाबा ,रहीम भाई यांनी सहभाग नोंदवला होता भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते त्यांनी यात्रेचे स्वागत करून ते परत 8 नोव्हेंबर रोजी सकाळी नांदेड लोहा मार्गे औरंगाबाद येथे जात असताना त्यांचा लोहा येथील शासकीय विश्राम ग्रह येथे कांग्रेस कमिटी लोहा पत्रकार संघटना व देऊळगाव येथील गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला
औरंगाबाद येथील कांग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ भाई हे मूळ देऊळगाव तालुका लोहा येथील असून पत्रकार मुर्तुजा शेख यांचे ते बंधू आहेत यामुळे पत्रकार मुर्तुजा शेख यांच्या वतीने स्वागत समारंभ ठेवण्यात आले होते
यावेळी कांग्रेस पक्षाच्या वतीने अल्पसंख्याक सेलचे लोहा तालुका अध्यक्ष माजी नगरसेवक शरफुदिन शेख माजी नगरसेवक अनिल दाडेल श्याम पाटील नळगे सतार शेख कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रतिनिधी मोहन पाटील भुजबळ पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष सुरेश महाबळे , केशव पाटील पवार जिल्हा प्रभारी अध्यक्ष डी एन कांबळे, तालुका अध्यक्ष जगदीश कदम, इमाम लदाफ ,गोविंद पाटील कदम ,विश्वनाथ कांबळे, देऊळगाव येथील चेअरमन डी एस सोनवळे ,कामाजी बंडेवार, अशोक पाटील सोनवळे, समीर शेख ,आकाश भुजबळ ,आदित्य पांचाळ यांनी स्वागत केले तर बाजारपेठेतील सुपर मार्केट येथे असिफ किराणा स्टोअर्स व भारत किराणा स्टोअर्सचे मालक इस्माईल पठाण, मुसा भाई पठाण, यांनी सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सन्मान केला
यावेळी शरफुदिन शेख यांची कांग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या लोहा तालुका अध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली त्याबद्दल औरंगाबाद जिल्हा कांग्रेस अध्यक्ष मा आमदार द कल्याण काळे व शहर जिल्हा अध्यक्ष युसूफ भाई शेख व मान्यवरांच्या वतीने शरफुदिन शेख यांचा सत्कार करण्यात आला.
कांग्रेस पक्षाचे औरंगाबाद जिल्हाअध्यक्ष मा आमदार डा कल्याण काळे व शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ भाई यांच्या कडून
शरद पाटील पवार यांच्या कुटूंबियांचे सांत्वन
लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद पाटील पवार यांच्या सुविद्य पत्नी कै मुक्ताबाई शरद पाटील पवार यांचे हृदय विकाराच्या आजाराने पंधरा दिवसांपूर्वी निधन झाले होते त्यामुळे शरद पाटील पवार व त्यांच्या कुटूंबियांना धीर देण्यासाठी कांग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मा आमदार डा कल्याण काळे शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ भाई यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटूंबाचे सांत्वन केले यावेळी जी प चे माजी शिक्षण व बांधकाम सभापती संजय पाटील कऱ्हाळे व औरंगाबाद येथील कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते