
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
सिडको :- गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या संकटात जनतेची चार पट होणारी लूट आर.टी.आय.कार्यक्रर्ते श्री.व्यंकटी जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त यांना माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता.सहाय्यक आयुक्त साहेबांनी श्री.हरी ओम मेडिकल स्टोअर्स सिडकोचे ४५ दिवस स्टोअर्स बंद ठेवण्याचे आदेश दिले असून ४५ दिवस मेडिकल स्टोअर्सला निलंबित करण्यात आले आहे.श्री हरी ओम मेडिकल स्टोअर्स दुकान क्रमांक ५ राज अपार्टमेंट,बी, सिडको नांदेड या पेढीचे औषध निरीक्षक श्री.मा.ज.निमसे साहेब यांनी दि.२६/६/२०२१ रोजी केलेल्या तपासणीत आढळलेल्या दोषाबाबत पेढीस या कार्यालयाचे पत्र क्रमांक,औसौप्र/कादानो/११५८/२०२१/२ दि.५/८/२०२१ अन्वये कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली असून त्यांच्या कडून त्याबाबत लेखी खुलासा प्राप्त करून घेण्यात आला.या पेढीचे स्पष्टीकरण समाधानकारक न आढळल्याने या कार्यालयाचे आदेश क्रमांक औसौप्र/पनिआ/८४२/२०२०/२ दि.२६/४/२०२२अन्वये पेढीचे विक्री परवाना दि.२६/७/२०२२पासून दि.९/९/२०२२पर्यंत एकूण ४५ दिवस निलंबित करण्यात आले.तिन रुपये किंमतीचा माॅस्क १० रुपयाला विकत होते.दैनिक चालू वार्ता व आर.टी.आय.कार्यकर्ते श्री.व्यंकटी जाधव सलीम पठाण यांच्या प्रयत्नाला यश आले असून.श्री.राठोड साहेब सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य नांदेड यांच्या वतीने निलंबित करण्यात आले असून जनतेची होणारी लूट थांबवून मेडिकल स्टोअर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.