
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- अहमदपूर तालूक्यात लांजी व परिसरात वैयक्तीकरित्या दहा हजार वृक्षारोपण करून त्याचे संगोपन केल्या बद्दल राज्याचे वनमंत्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे गौरव करण्यात आला.
या प्रसंगी अहमदपूर विधानसभा संघाचे माजी आमदार जेष्ठ नेते बब्रूवानजी खंदाडे साहेब यांची उपस्थिती होती.
या सत्कारामूळे माझ्या कार्याला नवीन उर्जा मिळाली असून नवयुवकांमध्ये वृक्षारोपण व संगोपनाची आवड निर्माण होवून त्यांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा रामानंद मूंडे यांनी व्यक्त केली.