
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी- लक्ष्मण कांबळे
उस्माननगर: – काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी पासून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात दाखल झाल्यामुळे संपूर्ण परिसर काॅग्रेस कार्यकर्त्याच्या एकजूटीतून नफरत छोडो…..भारत जोडो….या घोषणांनी आसमंत उजळून दणाणून गेला.भारत जोडो यात्रा मुळे युवा व ज्येष्ठ कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.
या यात्रेमध्ये युवक,, ज्येष्ठ , महीला, पुरूष कार्यकर्ते हाजारो उपस्थित होते.
भारत जोडो यात्रा ही खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली श्रीनगर ते काश्मीर निघाली आहे.खा.राहुल गांधी यांच्यासह दिग्गज नेते , पदाधिकारी, युवा, जेष्ठ कार्यकर्ते सुरक्षेच्या गरडातून या महामार्गाने मार्गस्थ होत असताना त्यांच्या स्वागतासाठी जागोजागी बॅनर तसेच महाराष्ट्राची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदाय दिंडी , भजनी ,विणेकरी व महापुरुषांच्या देखाव्यासह यात्रेच्या निमित्ताने स्वागत केले.काॅग्रेस पक्षाचे नेते खा.राहुल गांधी यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला महीला पुरुष यांनी गर्दी केली होती.
सकाळी ६ वा. कापसी गुंफा तुप्पा, जवाहरनगर येथे यात्रा स्वागत येथून यात्रेस प्रारंभ झाला. पुढे ही यात्रा , वारकरी संप्रदायाची परंपरा
असलेल्या टाळकरी, मृदंग, विणेकरी भजनी मंडळ, पोतराज, आदिवासी वाद्य, शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध १२ महापुरुषांच वेश परिधान करुन शालेय विद्याथ्यांनी स्वागत केले. यावेळी खा. राहुल गांधींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गच्चीवर उंच ठिकाणी लोकांनी तोबा गर्दी केली होती. यावेळी नफरत छोडो… भारत जोडो ….या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ही यात्रा चंदासिंग कॉर्नर येथे गेल्यानंतर तेथील श्री दत्त मंदिरात व यात्रीनी भोजनाचा आस्वाद घेतला. खा. राहुल गांधीसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्रांतीसाठी सिप्टा कंपनीत थांबले होते. या यात्रेत खा. राहुल गांधी यांनी चालत चालतच हात उंचावत जनतेला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा संदेश देत होते,
या भारत जोड़ा यात्रेने जिल्ह्याच्या युवा व जेष्ठ कार्यकर्तेमध्ये स्फुर्ती निर्माण केली आहे.नांदेड जिल्ह्याचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात ऐतिहासिक स्वागत केले.युवा कार्यकर्त्या पासून ते जेष्ठ कार्यकर्त्या पर्यत सर्वजन यात्रे मध्ये सहभागी झाले होते.उस्माननगर परिसरातून अनेक जन सहभागी झाले होते.प्रत्येकाच्या आवाजातून नफरत छोडो….भारत जोड़ो…खा. राहुल गांधी तुमं आगे बडो…हाम तुम्हारे साथ हे….या घोषणांनी आसमंत उजळून निघाला होता.या यात्रेतील घोषणामुळे कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.