दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
अधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी जाहीर करण्यात आली.हा कार्यक्रम इंदापूर या ठिकाणी शासकीय विश्रामगृहात पार पडला. यावेळी अधुनिक लहुजी सेना संस्थापक अध्यक्षा नगिणाताई सोमनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर राज्य प्रव्क्ता रामभाऊ कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव सुपसौधर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष राहुल आरडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खालील प्रमाणे नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
१)स्वाती राहूल आरडे
पाश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा,२) संतोष आरडे अध्यक्ष पूणे जिल्हा,३)आण्णासाहेब पवार
कार्याध्यक्ष पुणे जिल्हा,४)अभिजित बागाव कोरकमिटी अध्यक्ष – इंदापूर तालुका,५)रुपेश कांबळे
अध्यक्ष इंदापूर शहर,६)विजय संदिपान आरडे युवक तालूका अध्यक्ष इंदापूर तालुका,७)तानाजी मिसाळ संघटक इंदापूर तालुका,८) बक्कास पठाण तालुका उपाध्यक्ष इंदापूर तालुका,९) विठ्ठल नरहरि गायकवाड
तालुका संघटक इंदापूर,१०)दत्तात्रय बाळू मिसाळ कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा,११)राहूल भिमा आवघडे शहर अध्यक्ष टेंभुर्णी शहर,१२) रेखाताई खिलारे अध्यक्षा महिला आघाडी पुणे जिल्हा,१३)लक्ष्मीताई विकास मोहिते
इंदापूर तालुका आध्यक्षा, १४)नंदा कुमार साठे उपाध्यक्षा इंदापूर तालुका, १५) ज्योती शेलार संपर्क प्रमुख इंदापूर तालुका,१६) पुष्पा चंद्रकांत पूंढे अध्यक्षा माढा तालुका,१७)जयश्री अशोक ढाकले अध्यक्षा करमाळा तालुका १८) रुक्मिणी शिवाजी बागाव
माढा तालुका उपाध्यक्षा
कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागातील पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
