
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर :-आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी विद्यालयात राष्ट्रीय शिक्षा दिन साजरा करण्यात आले.
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण याविषयी माहिती सांगण्यात आली. 11 नोव्हेंबर 1888 रोजी जन्म झालेल्या स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री असलेले मौलाना आझाद यांची माहिती सांगत असताना वक्ते श्री. जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना त्यांचा थोडक्यात जीवन परिचय करून दिले. महात्मा गांधीजींचा प्रभाव असलेले मौलाना आझाद यांनी देशाच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केले .ज्यात संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी व ललित अकादमीची स्थापना त्यांनी केली ही माहिती विद्यार्थ्यांना सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व ,राष्ट्रीय सणाचे महत्त्व मुलांना सांगितले. आपला देश गतीने प्रगत होण्यामागे दूरदर्शी व्यक्तीमत्व असलेले भारतरत्न पुरस्कार प्राप्त असलेले मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.