
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
सर्व समाजामध्ये मुली या मुलांच्या खांद्याला खांदा लावून यशाची नवनवीन शिखरे सर करून आपला नावलौकिक वाढवत असलेले सर्वदूर पहायला मिळते. याला नाभिक समाजही अपवाद राहिला नाही.
याचेचं एक जीवंत मुर्तिमंत उदाहरण म्हणुन सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सैदापूर या गावची कु.अपेक्षा विजय शेटे ही १५ वर्षाची कुमारीका होय. अपेक्षा ही इयत्ता १० वी मध्ये शिकणारी मुलगी परंपरागत पुरूषप्रधान मानसिकतेला झुगारूण नाभिक व्यवसाय अर्थात सलून व्यावसायात आपले वडील विजय शेटे ,भाऊ ओमकार व स्वरूप शेटे यांच्या खांद्याला – खांदा लावून मुंबई ब्युटी पार्लर या सलून दूकानात पुरषांची दाढी करत असताना , केस कापत असताना पहायला मिळते. एक इयत्ता १० वी मध्ये शिकणारी सलून व्यावसायात पाय घट्ट रोवून उभी राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहूण परिसरात अपेक्षाचे सर्वदूर अप्रूप व कुतूहलाचा विषय झाला आहे.सलून व्यवसायात पदार्पण करून अपेक्षा या धाडसी नाभिक कन्येनं तर एक क्रांतिकारी इतिहासच रचला आहे.
याबाबत हकिकत अशी की ,अपेक्षाच्या घरची आर्थिक परिस्थितीही खाऊन – पिऊन सुखी असूनही शाळेला सुट्टीच्या वेळेमध्ये आपल्या ईतर दोन भावंडाप्रमाणे मलाही आपला समाजाचा सलून व्यवसाय शिकायचा आहे अशी ईच्छा तिने आपले वडील श्री विजय शेटे यांचेकडे व्यक्त केली. वडलांनीही तिच्या स्वयंमस्फूर्तीला दुजोरा देत , तिला सलून व्यवसाय शिकवण्याचे मनावर घेतले आणि तिथून सुरवात झाली , ही अशा ऐतिहासिक क्रांतिची…! आणि अत्यंल्प काळात तिने सलून व्यवसावर एक मजबूत पकड बसवली आहे.
पुढे हिच बातमी वार्यासारखी पसरत गेली याची दखल घेत राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,पत्रकार संजय पंडित यानी सामाजिक बांधिलकी जोपासताना राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या वतीने अपेक्षाचा तिच्या सलून मधे जाऊन यथोचित सत्कार व कौतुक तथा मनपूर्वक अभिनंदन करण्याचा ठरवले.
याच दरम्यान राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे प्रदेश संपर्क प्रमुख आणि पश्चिम महाराष्ट्र संघटक श्री.गजानन राऊत हे खास अपेक्षांचं कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी अचानक पणे तिच्या सलून मधे पोहचले. तिला सलून सेवा देत असताना पाहून राऊत यांचा आनंद आणि समाधान गगनात मावेना, त्यांची छाती अभिमानाने भरून आली. अशी त्यांची एकंदर परिस्थिती झाली. त्यांनी प्रत्यक्ष तिचेदुकानात व नंतर राहते घरी जावून सन्मानपूर्वक आदराने कौतुक केले आणि राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या माध्यमातून सकल नाभिक समाजाच्या वतीने तिचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा दिल्या.
सलून व्यवसायातील पदार्पण या अपेक्षाच्या निर्णयाने सकल नाभिक समाजाची मान अभिमानाने उंचावली असून अवघ्या १५ वर्षाच्या अपेक्षाने पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायावर महिला प्रतिनिधी म्हणून आपला ठसा उमटवला आहे.
प्रतिक्षाच्या या क्रांतिकारी निर्णयावर सकल नाभिक समाजासह , राज्यभरातून तिच्यावर अभिनंदना व कौतुकाचा वर्षाव होत आहे.