
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
सा.वा ह. भाविकांनी या पायी दिंडी यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन यज्ञेश्वर महाराज जोशी बेटमोगरेकर यांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ह. भ. प. भागवताचार्य योगेश्वर महाराज जोशी बेटमोगरेकर यांनी बेटमोगरा ते श्रीक्षेत्र बासर अशी पायी दिंडी यात्रा काढत आहेत ही यात्रा बेटमोगरा ,लोहगाव फाटा, कुंडलवाडी, धर्माबाद मार्ग बासरला दिनांक 21 नोव्हेंबर रोजी पोहोचणार आहे या यात्रेदरम्यान मुक्काम स्थळी भजन कीर्तन होणार असून दिनांक 19 नोव्हेंबर रोजी धर्माबाद येथे सद्गुरु ह. भ .प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे कीर्तन होणार आहे तसेच या यात्रेचा समारोप दिनांक 21 नोव्हेंबर रोजी होणार असून गंगा स्नान, आरती ,देवीचे दर्शनानंतर ह. भ .प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या पायी दिंडी यात्रेत भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यज्ञेश्वर महाराज जोशी बेटमोगरेकर यांनी केले आहे.