दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
जिवती
जिवती राजीव गांधी महाविद्यालय पाटण येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी राजुरा विधानसभा क्षेत्राच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 21 नोव्हेंबर ला या कार्यक्रमात गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
नुकत्याच राजुरा विधानसभा क्षेत्रासह चंद्रपूर जिल्हात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यात गोंडवाना गणतंत्र पार्टीने चांगली बाजी मारली आहे. त्याच नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचा आणि सरपंच उपसरपंचांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मनोजभाऊ आत्राम, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापूजी मडावी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तथा कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते गजानन पाटील जुमनाके, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, जिवती तालुकाध्यक्ष हनुमंत कुमरे कोरपना तालुकाध्यक्ष मेजर बंडुजी कुमरे, राजुरा तालुकाध्यक्ष अरुण उदे, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष प्रदीप कुळमेथे यांनी केले.
