
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या नांगरणीचे काम सुरू आहे.सर्व शेतकऱ्यांकडे बैलजोडी राहीली नाही, बैलजोडी ठेवणे परवडत नसल्याने शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर चा आधार घ्यावा लागतोय.तेंव्हा सर्व शेतकरी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करून घेत आहोत.ग्रामीण भागातील ट्रॅक्टर चालक अल्पवयीन व निरक्षर आहेत, तसेच ते दारू पिऊन ट्रॅक्टर चालवीत आहेत त्यामुळे त्यांना कायद्याची भीती वाटत नाही कारण अज्ञान त्यामुळे ते शेजारच्या शेतकऱ्याचे बांध (धुरा) फोडीत आहेत दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे ते रात्रीला दारू पिऊन धुरे फोडीत आहेत.म्हणजे एकतर रात्रीला शेजारचा शेतकरी सुध्दा येऊ शकत नाहीआणि पोलिसांचीही भीती राहत नाही.त्यामुळे कंधार पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक श्री.पडवळ साहेब व पि.एस.आय.श्री. इंद्राळे साहेब आणि त्यांच्या टीमने चोरी झालेल्या वाहनांची ज्याप्रमाणे तपासणी मोहिम राबविली त्या प्रमाणे ट्रॅक्टर चालकां विरूद्ध तपासणी मोहिम राबविण्याची मागणी कंधार तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी दैनिक चालू वार्ता पेपरच्या माध्यमातून ट्रॅक्टर चालकांची तपासणी मोहिम राबविण्यात यावी अशी मागणी केली आहे.ही तपासणी मोहिम राबविण्यासाठी कंधार तालुक्यातील प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांच्यातर्फे गावातील व परिसरातील बेकायदेशीर ट्रॅक्टर चालविणाऱ्या चालकांची माहिती मागवून तपासणी मोहिम राबवून होणारे भांडणे मारामार्या बंद कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.