दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी येथील माळीपुरा स्थित पशुपालक किशोर बाळे,रोशन बाळे,कपिल बाळे,अक्षय हाडोळे,विजय सदाफळे यांची दुब्ध-दुभती जनावरे लंम्पीच्या प्रादुर्भावामुळे दगावली आहेत.अगोदर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे.अश्या बिकट परिस्थितीतून बळीराजा आर्थिक संकटांना सामोरे जात असताना सुद्धा शासनाने पशुपालकांना अजूनपर्यंत मदत केलेली नाही.शासन तसेच प्रशासनाने संबंधित विषयी तत्काळ पंचनामे करून पशुपालकांना मदत करावी असे सामाजिक कार्यकर्ते व पशुपालकांची मागणी आहे.
अंजनगाव तालुका पशुवैद्यकीय विभागाला माहिती देऊन सुद्धा दगावलेल्या जनावरांच्या पांचानाम्यांकरिता डॉक्टर आले नसल्याचे पशुपालकांनी सांगितले आहे.आणखी पुन्हा सुद्धा एकाच पशुपालकाच्या ६ गायी लंम्पी रोगाच्या कचाट्यात सापडलेल्या असून अद्याप सुद्धा पशुवैद्यकीय अधिकारी दखल घेत नाही व मरण पावलेल्या जनावरांची नोंद घेण्यास सुद्धा नकार देत असल्याचे पशुालकांचे म्हणणे आहे.
—————————————-
—————————————-
*शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास सततच्या पावसामुळे हिरावून घेतलेला आहे.त्यामुळे यापूर्वीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना आता आणखीच त्यामधे भर पडलेली आहे ती म्हणजे गुरांना होत असलेला गंभीर लंम्पी आजार या आजारामुळे शेतकरी अतिशय हवालदिल झालेला आहे.याबाबत अंजनगाव सुर्जी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांना वारंवार विनंती करून सुद्धा या गंभीर आजाराच्या समस्येकडे संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी व संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने येथील शेतकरी अतिशय त्रस्त झालेला आहे.गुरांना होत असलेल्या लम्पी आजाराचा सामना करण्याकरिता लसीकरण करणेबाबतची तसेच दगावलेल्या जनावरांचे पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी.वारंवार विनंती करून सुद्धा संबंधित अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करीत असेल तर संबंधित विभागासमोर आम्ही सर्व शेतकऱ्यांसोबत उपोषणाला बसू.- प्रवीण पटुकले,सामाजिक कार्यकर्ते,अंजनगाव सुर्जी
