दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल -माणिक सुर्यवंशी
बिलोली तालुक्यातील मौजे आटकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आटकळी येथे दि.21नोव्हेबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय यांच्यामार्फत शाळेला स्मार्ट टीव्ही एक ते पाच वर्गासाठी देण्यात आले व त्याचे उद्घाटन गावचे प्रथम नागरिक श्रीमती सरपंच पुष्पाबाई घोडके यांच्या हस्ते उद्घाघाटन करण्यात आले यावेळी उपसरपंच रणवीर पाटील डोंगरे व शालेय समितीचे अध्यक्ष मारोतराव पोलकमवाड शिवाजी पाटिल डोंगरे मल्लिकार्जुन पोलकमवाड शाळेचे मुख्याध्यापक श्री दयाडे ए जी मठदेवरू सर मारताळे सर सलगरे सर चव्हाण सर सौ मारमवार मॅडम सौ जाधव मॅडम श्रीमती शहनाज मॅडम सौ ईडलवार मॅडम सौ.खैरगावे मॅडम या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. शाळेला स्मार्ट टीव्ही दिल्याबद्दल ग्रामपंचायतीचे शाळेतर्फे मनपूर्वक आभार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आटकळीचे शिक्षक वृंद शिक्षीका उपस्थित राहुन या कार्यक्रमात सहभागी नोंदवला होता.
