दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न व मागण्यांसाठी नवीन बस स्थानक येथून तहसील कार्यालयावर नांगर मोर्चा शिवसेनेच्या वतीने काढण्यात आला होता.(शिवसेना उद्धव ठाकरे)जिल्हा पदाधिकारी,महीला पदाधिकारी,तालुका पदाधिकारी,शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत बळीराजा सुद्धा आंदोलनात क्रांतीची मशाल हाती घेऊन रास्त मागण्यांसाठी आपली बैलजोडी,टॅक्टर,शेतातील खराब झालेली पिके घेऊन शासन दरबारी धडकला होता.
सततच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.त्यामुळे अंजनगाव सुर्जी तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा,सरसकट पीकविमा लागू करावा,अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित बळीराजाला तातडीने मदत द्या,कृषी पंपाला दिवसा ८ तास वीज पुरवठा करावा अश्या महत्त्वपूर्ण चौदा मागण्यांचे निवेदन तहसीलदार अभिजित जगताप यांना यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आले.
