दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
अतिवृष्टीमुळे खारीपाचे नुकसान झाले असता आता रब्बीच्या मागे लागेल मंठा महावितरण
शेतकऱ्यांची वीज तोडू नका कारण अतिपावसामुळे खरीपाचे पिके गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे मुख्यमंत्र्याचा आदेश असतानाही हानवतखेड येथील शेतकऱ्यांची रिकवरी च्या नावाखाली विज प्रवाह तोडल्या जात आहे.
मुख्यमंत्री व अन्न सुरक्षा आयोगाचे आदेश असतानाही रिकवरी च्या नावाखाली विज महावितरणचे इंजिनीयर जंगम हे शेतकऱ्यांना वसुलीसाठी वेठीस धरत आहेत इंजिनीयर जंगम यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हानवतखेड येथील शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की मुख्यमंत्री व अन्न सुरक्षा आयोगाचे शेतकऱ्यांची वीज तोडू नका असा आदेश असतानाही विज महावितरणचे इंजिनीयर जंगम शेतकऱ्यांना विठेस धरत आहेत.
इंजिनीयर जंगम हे मुख्यमंत्र्यापेक्षा मोठे आहेत का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. हनवतखेड येथील शेतकऱ्यांची विज तोडल्यास वीज महावितरण कंपनी समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आला आहे.
वीज महावितरण कंपनीचे इंजिनियर जंगम हे मंठा येथून बदली होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना वसुलीच्या नाहक त्रास देत आहेत. अशी चर्चा आहे. यात वरिष्ठांनी लक्ष घालून बेलगाम इंजिनियर जंगम यांना लगाम लावण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांचे किंवा गावकऱ्यांचे रोहयंत्र किंवा इतर कामासाठी महावितरणच्या कार्यालयात गेले असता इंजिनिअर जंगम हे कधीच हजर नसतात व भेटले तर सर्व उडवा उडवी चे उत्तर देऊन मोकळे होतात यामुळे शेतकरी व गावकरी हवालदिल झाले आहेत. यात वरिष्ठांनी लक्ष घालून इंजिनीयर जंगम यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे हानवतखेड शेतकऱ्यांचे मान्य म्हणणे आहे.
शेतकऱ्यांचा वीज तोडली जात आहे याबाबत महावितरणचे इंजिनियर जंगम यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की रिकवरी साठी वरिष्ठ पातळीवरून आदेश आहे.
(मुख्यमंत्री व अन्नसुरक्षा आयोगाचा आदेश असतानाही वीज महावितरण कंपनीची इंजिनियर हे आपल्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. मुख्यमंत्री यांच्या आदेश असतानाही हनवतखेड येथील शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे मुख्यमंत्र्यापेक्षाही महावितरणचे इंजिनियर जंगम हे मोठे आहेत का असा प्रश्न गावकऱ्यांना पडत आहे. यात वरिष्ठांनी लक्ष घालून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबून इंजिनीयर जंगम यांच्यावर कारवाई करण्यात यावी
योगेश गणगे (शेतकरी हनवतखेड))
