
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनीधी- माधव गोटमवाड
कंधार तालुक्याती शेतकरी अतिवृष्टी मुळे शेतकरी बांधव हतबल झाले आहेत.त्यातच शासना कडुन आर्थिक आनुदान हि अंत्यत तुटपुज्या स्वरुपात देण्यात आले व विमा कंपनी तर विमा मंजुर करुन विमा परताव करताना शेतकर्याची एक प्रकारची चेष्टाच केली आहे. हे सर्व शेतकरी बांधव सहन करत असताना मधेच सक्तीने विज बिल वसुली व वीज कलेक्शन तोडणे चालु केल्यामुळे शेतकरी पुर्ण ता हातबल झाले आहेत. शासन एका हतान तटपूंजी मदत देयाच व दुसर्या हाताने दाम दुप्पट विज बिल शेतकरी बांधवान कडुन काढुन घेयाच या शासकीय धोरना मुळे शेतकर्या समोर आत्महंत्या शिवाय पर्याय उरलेल नाही.असे वंचित बहुजन आघाडी कंधार तालुका. अध्यक्ष संतोष पाटील गवारे.यांनी म्हणले आहे तसेच यामुळे सक्तीचे विज बिल वसुली व शेतकऱ्यांची वीज तोडणी त्वरीत थांबवावे असा ईशारा दिले.सक्तीची वसुली न थाबवल्यास पुढील काळात शेतकर्याना सोबत घेउन वंचित बहुजन आघांडी रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही. सक्तीचे वसुली करणार्या व विज कलेक्शन कट करनार्या आधिकार्याना उत्तर देण्यात येईल. यात कायदा व सुवेवस्था प्रक्ष्न निर्मान झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे कंधार तालुकाध्यक्ष संतोष पाटील गवारे यांनी दिला आहे.