
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:-निसर्गाच्या लहरीपणामुळे व ओल्या दुष्काळामुळे व सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. असे असतांना देखील महावितरण कार्यालयाकडून शेतकऱ्यांची विज खंडीत करुन हुकूमशाही पध्दतीने बिल वसुल करुन शेतकऱ्यांना खेळण्याचे काम चालू आहे.राज्य अन्न सुरक्षा आयोगाने महावितरण कंपनीना शेतकऱ्यांचे शेतीतील विज न कापण्याचा आदेश व सुचना केली असतांना देखील शेतकऱ्यांची विज खंडीत करुन शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम विद्युत महावितरणाकडून होत आहे. ते त्वरीत थांबविण्यात यावे. अन्यथा शिवसेना कंधारच्या वतीने कोणत्याही क्षणी महावितरण कार्यालयास शिवसैनिक व शेतकऱ्यांच्या वतीने टाळे ठोकण्यात येईल. होणाऱ्या परिणामास आपला मनमानीपणा कारणीभुत राहील यांची नोंद घ्यावी.यासंबधित शिवसेना विधानसभा संघटक गणेश भाऊ कुंटेवार, शिवसेना तालुकाप्रमुख कंधार परमेश्वर पा.जाधव, शिवसेना तालुका संघटक पंडीत देवकांबळे, युवासेना ता.अधिकारी कंधार सचिन जाधव यांनी मा.उप अभियंता साहेब,विद्युत महावितरण कार्यालय कंधार यांना निवेदन दिले आहे.