
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
पेठवडज :- मौजे पेठवडज येथील प्रकल्पाअंतर्गत उजव्या व डाव्या कालव्याच्या दुरूस्तीचे काम चालू असून ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याने.या कामाबाबत गजानन जाधव यांनी संबंधित कार्यालयाचे कर्मचारी विठ्ठल जायनुरे यांना कामाचे अंदाजपत्रक व गुत्तेदार कोण आहेत असे विचारले असता त्यांनी आपणास या कामाबाबत कसलीच माहिती नसल्याचे सांगून उडवाउडवीचे उत्तर देत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते गजानन जाधव यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता साहेब नांदेड यांच्याकडे स्थानिक कर्मचारी यांची तक्रार केली तसेच कालव्याच्या दुरूस्तीचे काम अंदाज पत्रकानुसार करावे अशी विनंती केली,माहिती अधिकार कार्यकर्ता संघाचे कंधार तालुका अध्यक्ष गजानन जाधव