
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 कामाचे काम प्रगतीपथावर असून लातूर ते नांदेड या मार्गाचे 70 टक्के काम पूर्ण होत असल्याचे पाहायला मिळते
तालुक्यातील कारेगाव येथील शेतजमिनीतून केटीएल कंपनीने तब्बल २० हजार ब्रास गौण खनिजाचे अवैध उत्खनन करून शासनाचा करोडो रुपायांचा महसुल बुडविला आहे.
याबाबत मंडळ अधिकारी तथा तलाठी यांनी दि. १ फेब्रुवारी रोजी तहसीलदारांना अहवाल सादर केला आहे. ६ महिने उलटले तरी तसीलदारांनी कार्यवाही करण्यास टाळाटाळ केल्याने सर्वसामान्यांतून संताप व्यक्त होत आहे. केटीएल कंपनीविरूध्द कार्यवाही करून बुडालेला महसूल तात्काळ वसूल करावा, अशी मागणी जोर धरीत आहे.
कल्याण टोल प्लाझा प्रायव्हेट इंडिया लिमिटेड कंपनीकडून नांदेड-लातूर महामार्गावर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. या महामार्गासाठी कारेगाव येथील शेतजमिनीतून ४० हजार ब्रास गौण खनिज उत्खननाची परवानगी तहसीलदारांना मागण्यात आली होती. पण परवानगी न घेताच कारेगांव येथील शेतजमिनीतून २० हजार ब्रासच्या वर गौण खनिजाचे अवैध उत्खनन करून या महामार्गावर दगड, मुरूम टाकण्यात येत आहेत. यासाठी कारेगांव, किरोडा, पोले वाडी, दापशेड यासह ईतर गावातून दगड आणि मुरूमाची अवैध वाहतुक केली जात आहे. कारेगांव येथील शेतजमीनीतुन ४० हजार ब्रास गौण खनिज उत्खननाची परवानगी तहसीलदारांना मागण्यात आली. परंतु परवानगी न घेताच कारेगांव येथील
शेत गट नंबर ११२,८५,९२,९४,९५,९८ मधील ३ हेक्टर २० आर शेतजमीनीतून ७ हजार ५०० दगड, गौण खनीजाचे अवैध उत्खनन केले आहे. केटीएलने कारेगांव येथून २० हजार ब्रास गौण खनिजाचे अवैध उत्खनन केले असल्याचा अहवाल तलाठी सज्जा कारेगाव व मंडळ अधिकारी सोनखेड यांनी दि. १० डिसेंबर २०२१ रोजी येत आहे. लोह्याच्या तहसिलदारांना सादर केला. त्यानंतर तहसीलकार्यालयाने तलाठी कारेगाव व मंडळ अधिकारी सोनखेड यांना सदर चौकशीसाठी दि.३१ जानेवारी रोजी आदेश काढले होते. आदेशाप्रमाणे तलाठी, मंडळ अधिकारी सोनखेड यांनी वरील गट क्रमांकातील दगड, मुरुम गौण खनीजाचे अवैध उत्खनन व वाहतुक होत आहे.
असल्याचे दि. १ फेब्रुवारी रोजीच्या पंचनामा अहवाला व्दारे तहसिलदार मुंडे यांना गौण खनिजाचे अवैध उत्खनन झाल्याचा अहवाल पाठविला. परंतू शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या केटीएल कंपनीविरोधात कारवाई करण्यास टाळटाळ करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात
या प्रकरणी संबधीत कंत्राटदारावर कार्यवाही करुन २० हजार ब्रास गौण खनिजाची रॉयल्टी भरुन घ्यावी व कारेगाव सह अनेक गावात होत असलेल्या अवैध उत्खननाची ईटीएस मशीन व्दारे मोजणी करून केटीएल कंपनीविरुद्ध कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरू लागली. यासह सध्या लोहा ते अहमदपूर मंगरूळ घाटावर रात्रंदिवस अवैधरित्या हजारो टिप्पर मुरूम उत्खनन होत आहे याकडे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी नांदेड यांनी लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांची आहे.