
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा तालुक्यातील माळाकोळी सर्कलमधील खेडकरवाडीगावात अनेक दिवसापासून माकडे , वानर व वन्य प्राण्यांनी गावात अनेक दिवसापासून धुमाकूळ घातला असून महिलांना व लहान बालकांना आठ ते दहा माकडांनी जावा घेतला परंतु वन विभाग जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे
काही महिलांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. घरात घुसून माकडे भाकर नेण्यासाठी येत असतात व महिलांना व वृद्ध व्यक्तींना चावा घेतला जातो याकडे वनविभागाने योग्य ती उपाय करून माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी खेडकर वाडी गावातील नागरिकांनी केली आहे.