
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार:-
कंधार तालुक्यातील शिराढोण या पंचक्रोशीत शेतकरी कुटुंबात जन्मलेले शिवानंद रामेश्वर पांडागळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कर निरीक्षक या पदासाठी घेतलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केला आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
परिस्थिती कशीही असो मनात जिद्द असल्यास कोणत्याही क्षेत्रात यश पदरात पडल्याशिवाय राहत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे कंधार तालुक्यातील शिराढोण या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले शिवानंद रामेश्वर पांडागळे हे आहेत. शिवानंद पांडागळे हे शिराढोण येथे जन्मले असले तरीही त्यांचे प्राथमिक शिक्षण श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल सिडको नांदेड येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून. माध्यमिक शिक्षण सायन्स कॉलेज नांदेड येथून पूर्ण केले त्यांनी पुढील शिक्षणासाठी मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.सन २०२१ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्यकर निरीक्षक या पदासाठी पुण्यातील एमआयटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथून परीक्षा देऊन घवघवीत यश संपादित केले आहे. त्यांनी संपादन केलेल्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.त्यांच्या या यशाबद्दल कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजीराव पांडागळे, राज्याचे सेवानिवृत्त शिक्षक संचालक गोविंदराव नांदेडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, गावचे सरपंच खुशालराव पांडागळे,बाबुराव पांडागळे(माजी स्वीकृत सदस्य) बालाजी पांडागळे(सेवानिवृत्त वाहतुक नियंत्रक)मनोहर पांडागळे ,भालचंद्र पांडागळे, देवराव पांडागळे यांच्यासह सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक केले जात आहे.