
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
यापूर्वी ज्या ज्या पक्षाने सत्ता सत्ता भोगले त्या पक्षाने शेतकऱ्यांना पाणी रस्ते वीज देऊ असे सांगून आता भोगत आहेत, या महाराष्ट्राला मनसे अध्यक्ष:श्रीमान राज साहेब ठाकरे यांच्या सारख्या नेत्याची गरज आहे,कारण सध्या रब्बी पिकांचे हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना नोटीसा देऊन महाविज वितरण कंपनी अनेक वर्षापासून थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांचे सक्तीने बिल वसुली करीत आहे, गहू ज्वारी हरभरा इतर रब्बी पिकांच्या हंगामात दरवर्षी यांचा हा लुटालुटीचा खेळ चालू असतो या महावीज वितरण कंपनीच्या या खेळाविरुद्ध राजकीय नेते सुद्धा अप्रत्यक्ष सहभागी असतात कारण सत्तेत एक बोलायचे सत्य आल्यावर एक बोलायचं खरे तर जी.एस.टी सारख्या करा पोटी अनेक स्वरूपात केंद्र सरकारला कर देणारे राज्य म्हणजे देशातील सगळ्यात मोठे राज्य महाराष्ट्र राज्य आहे, या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना २४ घंटे वीज उपलब्ध व्हायला हवी, कारण वाढती लोकसंख्या पाहता शेतकऱ्यांना दोन शिफ्ट मध्ये शेती करावी लागते, देश कृषीप्रधान आहे जो पर्यंत या देशातील शेतीचा पूर्णपणे विकास होणार नाही, शेती विकसित होणार नाही तो पर्यंत आपण महासत्ता वगैरे बोलणे बरोबर नाही,म्हणून महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना बनवा बनवी करतात हे योग्य आहे का तुम्ही जनतेला वेडे समजता का ? परंतु ही गोष्ट खरी आहे की जनतेच्या लक्षात आले नाही, जोपर्यंत जनता योग्य नेतृत्वाला मतदान करीत नाही तो पर्यंत जनतेचा विकास होणार नाही, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये सतेत असणारे सत्तेच्या बाहेर असणारे सत्ता मिळण्यासाठी जे खोटं बोलून वक्तव्य करतात सत्ता आल्यानंतर त्या लोकांची टिंगल टवाळी करुन जनतेचे प्रश्र्नांची उडवा उडवी केले जातात, म्हणून एक दिवस या महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येईल आपल्याला अनेक वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी सेना सारख्या सगळ्या पक्षांनी सत्ता भोगले शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाही हि पक्ष फसवणूक नाही का, कारण आपण शेतकऱ्यांनी कोणाला मतदान केले पाहिजे हि गोष्ट लक्षात आली पाहिजे.
कारण सरकारमध्ये नसताना सत्तेच्या बाहेर असतानी अनेक उदाहरणं देऊन उत्तर प्रदेशातील सरकारने शेतकऱ्यांच्या बिलाचे पैस सांगता शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा वीज कनेक्शन न तोडता शेतकऱ्यांना वीस द्या अशी मागणी करतात परंतु सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना सांगता आत्ता पैसे भरावे लागते कारण महावीर वितरण कंपनी चालवायला पैसे लागतात, म्हणून म्हणतो स्वर्गीय जगप्रसिद्ध नाट्य कलाकार लक्ष्मण देशपांडे यांचे वऱ्हाड निघाले लंडनला नाटका पेक्षा ही सुपरहिट एक पात्री नाटक आपल्याला जमले राव खूप छान मा.देवेंद्रजी, म्हणून अनेक वर्षापासून महाबीज वितरण कंपनी शेतकऱ्यांना मानसिक त्रास देत आहे, महाबीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने थकीत बिलाच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरून सक्तीने वसुली करीत आहे, काही ठिकाणी तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी निवेजीत कट रचून रेगुलर बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना डिफॉल्टर करायचे आणि हप्ते खोरी चालु होते मग शेतकऱ्यांकडून वैयक्तिक पैसे वसूल करायचे हा धंदा चालू होतो, म्हणून मा.फडवणीस यांच्या दुटप्पी धोरणाच्या विरोधात लवकरच मराठवाड्यातील जालना जिल्ह्यासह परतूर मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते मा.दिलीप बापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडणार असे ही माहिती सोळंके यांनी दिलेली आहे…