
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
ता. बारामती-माळेगांव लग्न म्हटले की घरात आनंदाचे व उत्साहांचे वातावरण असते.असेच वातावरण माळेगांव कारखान्यांचे निवृत्त कर्मचारी अनिल पांडुरंग येळे यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या लग्नांच्या निमिंत्ताने होते. लग्न समारंभाच्या निमिंत्ताने नातेवाईक व मित्र परिवारांच्या साक्षीने शनिवारी दिनांक १९ रोजी दुपारी लग्न समारंभ पार पडला.सगळे कसे या नवदांपत्यांने पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणे चालू होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळं चालू होतं आणि गुरुवारी पहाटे नवरा मुलगा सचिन उर्फ बबलू येळे (वय २५ रा. माळेगांव) यांचा पहाटे एक वाजता हृदयविकारांच्या तीव्र झटका आला.यानंतर नातेवाईकांनी त्वरित बारामती येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी दाखल केले परंतु डॉक्टरांनी नवरा मुलगा सचिन मृत पावल्यांचे सांगितले ही बातमी माळेगाव परिसरांत वाऱ्यासारखी पसरली. आणि एकच खळबळ उडाली सर्वांची मने सुन्न झाली. सचिनच्या घराकडे नातेवाईकांचा व मित्रपरिवारांचे लोंढेच्या लोंढे येऊ लागले. सचिनचा मृतदेह ज्या मंडपात सत्यनारायणाची पूजा घातली होती. त्याच मंडपात अंत दर्शनासाठी ठेवण्यांत आला होता. यावेळी सचिनच्या आई-वडिलांसह नातेवाईकांचा मित्र परिवारांचा व नव पत्नी हर्षदाचा आक्रोंश पाहून उपस्थिंताचे डोळ्यांतील अश्रूं थांबत नव्हते. हर्षदाच्या हातामधील चुडा मेहंदी व अंगावरील हळद तशीच होती. नव संसारांचे स्वप्न पाहिलेला नवोदांपत्यांमधील सचिनच्या मृत्यूने हर्षदाला मानसिक धक्का बसलेला आहे. त्यामुळे तिला आता पुढील आयुष्य जगण्यांचा मोठा घन प्रश्न निर्माण झाला आहे.