
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
२१ देशांनी घेतला होता सहभाग
जव्हार:- इटली येथे पार पडलेल्या २०२२ च्या फुनाकोशी शोटोकान जागतिक कराटे स्पर्धेत २१ देशांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत जव्हार येथील वृत्तपत्र विक्रेते दिवंगत महेश कुलकर्णी यांची भाची व मंजुषा कुलकर्णी खेडकर यांची कन्या इराने काता आणि कुमिते मधे ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले आहे.ठाणे येथील युनायटेड बुडोकॉन कराटे अकॅडेमीचे प्रमुख संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इरा खेडकर,अमेय वायंगणकर,राजस साठे यांनी या जागतिक पातळीवरील चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला होता.
जव्हार आजोळ असणाऱ्या इराने या आधीही आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत.इरा ही सध्या रुईया कॉलेजमध्ये एफ.वाय.बी.ए चे शिक्षण घेत असून कराटेच्या प्रशिक्षणा बरोबरच कत्थक नृत्याचे पण शिक्षण घेत आहे.
या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.