
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – प्रभाकर पांडे
सोनखेड : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्याच्या अनुषंगाने आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहोत. शेतकऱ्यांना आणि कापूस उत्पादकांना न्याय देता यावा या अनुषंगानेच लोहा तालुक्यातील पिंपरणवाडी येथे शांतिदूत कॉटन इंडस्ट्रीज आणि कापूस खरेदी केंद्र उभारण्यात आले आहे . या कापूस खरेदी केंद्र मार्फत कापसाला प्रतिक्विंटल साडेनऊ हजार भाव देण्यात येईल अशी ग्वाही खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे आज खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते शांतिदूत कॉटन इंडस्ट्रीचा भव्य शुभारंभ करण्यात आला यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते.
लोहा तालुक्यातील पिंपरणवाडी येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या शांतिदुत कॉटन इंडस्ट्रीजचा भव्य शुभारंभ नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी सौ.प्रतिभाताई प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रमुख भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतुकराव हंबर्डे, दिलीप कुदंकर्ते, चैतन्यबापू देशमुख, राजेश देशमुख कुंटूरकर, धर्मराज देशमुख, बालाजी बच्चेवार, बाळू खोमणे, माणिकराव मुकदम, भाजपा संघटन सरचिटणीस गंगाधरराव जोशी, भाजपा जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर, श्रावण पाटील भिवलंडे, एडवोकेट संदीप पाटील चिखलीकर डॉ.प्रमोद पाटील चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर, भाजपा वैद्यकीय आघाडीचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सचिन उमरेकर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट किशोर देशमुख, भाजपा महिला मोर्चाच्या महानगराध्यक्षा सौ.वैशालीताई मिलिंद देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती तथा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे ढाकणीकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, लोहा बाजार समितीचे सभापती बालाजी पाटील मारतळेकर, माझी जिल्हा परिषद सदस्य विनायकराव पाटील शिंदे, लोहा नगरपालिकेचे उपाध्यक्ष दत्ता वाले, गटनेते करीम शेख, कंधार नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन, सुभाष गायकवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावला पाहिजे. त्यांच्या शेतीमालाला योग्य बाजार भाव मिळाला पाहिजे . यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे .एवढेच नाही तर शेतकरी ,कामगार आणि लोहा कंधार तालुक्यातील जनतेने चिखलीकर कुटुंबांवर जे प्रेम केले ,जो विश्वास दाखवला, त्या प्रेम आणि विश्वासाच्या अनुषंगाने आपण शेतकरी आणि कामगारांचेही काही देणे लागतो या उदात हेतूने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळावा, अनेकांच्या हाताला रोजगार मिळावा या उद्देशाने शांतिदूत कॉटन इंडस्ट्रीज आणि कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट आणि कोंडी केली जाते ही बाब लक्षात घेता शांतिदूत कॉटन इंडस्ट्रीज शेतकऱ्यांना न्याय देईल. त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. जो प्रकल्प आपण उभारला आहे तो प्रकल्प केवळ लोकहितासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे. निश्चितपणे शांतिदूत कॉटन इंडस्ट्रीच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांचा आणि कापूस उत्पादकांचा विकास होईल असा विश्वास आहे खा. चिखलीकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान यावेळी राजेश देशमुख कुंटूरकर , प्रवीण साले, भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांची समयोचीत भाषणे झाली. शांतिदुत कॉटन इंडस्ट्रीज आणि कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभ सोहळ्यास लोह कंधार तालुक्यातील कापूस उत्पादक, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोहा कंधार तालुक्यातील जनतेने चिखलीकर कुटुंबावर केलेले प्रेम कधीच विसरू शकत नाही
………
शांतिदूत कॉटन इंडस्ट्रीज आणि कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी शेतकरी आणि उपस्थितांशी संवाद साधताना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा आणि कंधार तालुक्यातील जनतेचे प्रेम आणि ऋण व्यक्त केले. ते म्हणाले की, लोहा आणि कंधार तालुक्यातील जनतेने चिखलीकर कुटुंबावर केलेले प्रेम हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या जिव्हाळ्यामुळे आम्ही हा इथ पर्यंतचा प्रवास करू शकलो. भविष्यातही हे प्रेम असे कायम आमच्या पाठीशी राहील असा विश्वास खा. चिखलीकर यांनी यावेळी व्यक्त केला.