
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-गणेश वाघ:-
तालुक्यातील जांभुळधाबा येथील शेतकरीपुत्र वैभव शिंबरे (वय,२२) वैभव मोरे (वय,२२) राहूल बिलावर (वय,२०) यांची केंद्रामधील नरेंद्र मोदी सरकारची तरुणांसाठी महत्वपूर्ण ठरत असलेल्या ‘अग्निवीर’ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यदलात भरती झाली. विशेष म्हणजे एकाच गावातील तीन युवकांची एकाच वेळी भरती झाल्याबद्दल गावातील तरुणांनी गावभर मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतिषबाजी करून पेढे वाटप करुन आनंदत्सोव साजरा करण्यात आला. जवळपास २ वर्षापासून जांबुळधाबा ते नाडगाव ते जामाठी व परत जांबुळधाबा दोन ते अडीच तासामध्ये रनींग करुन स्वतःचे भाग्य देशाच्या हवारे करणारे भारतीय सौनिक म्हणून मान मिळवला आहे. वैभव शिंबरे, वैभव मोरे, राहूल बिलावर या युवकांचे प्राथमिक शिक्षण जि.प मराठी प्राथमिक शाळा येथे १ ते ४ पर्यंत तसेच नंतर ५ ते १० पर्यंत शिक्षण आदर्श विद्यालय जांभूळधाबा गावातली शाळेत पुर्ण केले. तिन्ही युवकांना लहानपणापासून सैन्य दलात जाण्याची इच्छा पूर्ण झाली. गरीब कुटूंबातील असलेले हे युवकांची मेहनत फळाला लागली. लॉकडाऊन मध्ये दोन वर्ष वाया गेल्यामुळे सतत अभ्यास, व्यायाम, केलेले अथक परिश्रमातून यश संपादित केले. या यशाबद्दल तिन्ही युवकांनी आपले श्रेय आई वडिल आपले शिक्षक मंडळींना दिले आहे. त्यांच्या यशाबद्दल गावभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील ग्रामस्थांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चैनसुख संचेती यांनी मिरवणूक दरम्यान भेट दिली असता त्यांचा हार, पुष्प, देऊन सत्कार केला.
प्रतिक्रिया:-
◼️ सोड रे तुझ्याने काही ही होणार नाही रे किती वर्ष झाले तयारी करतोय असे भरपूर समाजातील टोमणे गावातील लोकांचे टोमणे संघर्ष करताना जागोजागी अपमान सहन करतांना परिस्थितला न डगमगता माझे स्वप्न मी पुर्ण केले, अशी प्रतिक्रिया वैभव शिंबरे (नवनिर्वाचीत सौनिक युवक) यांने बोलतांना दिली.
◼️ दररोज बोलणाऱ्या लोकांकडे मी आज लक्ष दिले, असते तर मी आज भारतीय सैन्य दलात भरती झालेले नसतो. पोलीस भरती गावठी ट्रिक्स पासून मला भरपूर काही शिकायला मिळालेला आहे. मी आज खुप आनंदी आहोत, अशी प्रतिक्रिया वैभव मोरे (नवनिर्वाचीत सौनिक युवक) यांनी बोलतांना दिली.
◼️ मित्रांनो खचून कधीच जाऊ नका वेळ प्रत्येकाची येते. आपले प्रयत्न सतत चालूच ठेवा एक ना एक दिवस आपल्याला आपल्या मेहनतीनचे फळ मिळतेच. आम्हाला सुध्दा लोकांनी खुप टोमनेदिले पण ज्यांनी टोमने दिले ते आज आमचा सत्कार करायला आमच्या घरी येत आहे. व आम्हाला त्यांचा आनंद झाला.असे सांगून शेवटी म्हणाले की शेवटी आम्ही तिन्ही नी पण युवक भारतीय सैन्य दलात भरती झालोच अशी प्रतिक्रिया राहुल बिलावर (नवनिर्वाचीत सौनिक युवक) यांने बोलतांना दिली.