दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कळका :- कंधार तालुक्यातील कळका येथील जुने गावठाणचा सर्वे झालेले आहे.त्याचा नकाशा व यादी जाहीर करण्यात आली असून यादी ग्रामपंचायत कार्यालय कळका येथे लावण्यात आली आहे.ती यादी पाहून जर कोणाची काही तक्रार असल्यास ज्यांना तक्रार दाखल करायची आहे त्यांनी सात दिवसांच्या आत तक्रार दाखल करून आपली असलेली समस्या मांडून तक्रारी चे निवारण करून घ्यावे असे आवाहन कळका ग्रामपंचायत कार्यालय यांच्यातर्फे गावातील नागरिकांना कळविण्यात येत आहे.अशी माहिती सरपंच सौ.सुनंदा हरीभाऊ गादेकर, उपसरपंच प्रतिनिधी श्री.राजीव पाटील गायकवाड, ग्रामविकास अधिकारी श्री.व्ही.के.नारनाळीकर यांनी नागरिकांना केले आहे.
