
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-सन २०२२-२३ मध्ये अंजनगाव सुर्जी पंचायत समितीला रमाई आवास योजनेचे २७० घरकुलांचा लाभ मिळाला व वाढीव टारगेट सुद्धा मिळाले आहे.पं.स. अंतर्गत सर्व ग्रामपंचायत कडून रमाई आवास योजने अंतर्गत ग्राम पंचायतीने पात्र लाभार्थ्यांची फाईल व यादी अंजनगाव पंचायत समितीमध्ये पाठवण्यात आल्या.पंचायत समितीने लाभार्थ्यांची यादी व फाईलची संपूर्ण पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांची पालकमंत्र्यांच्या मंजुरी करिता जिल्हास्तरावर पाठवण्यात आल्या परंतु पालकमंत्र्यांची जिल्हा स्तरावरची मीटिंग अजून पर्यंत झाली नसल्याचे माहिती मिळाली.जोपर्यंत पालकमंत्र्यांची मुंजुरात होत नाही;तोपर्यंत रमाई आवास घरकुलाचा लाभ गरजू लाभार्थ्यांन पर्यंत मिळणार नाही.म्हणून पालकमंत्र्यांनी रमाई आवास योजने अंतर्गत गोरगरीब गरजू लाभार्थी यांची तातडीने मीटिंग घेऊन पात्र लाभार्थ्यांना मंजुरात देण्यात यावी अशी तालुक्यातील रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांची मागणी करीत आहेत.