
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
साकुर पठारभागातील खाद्याबाबत वेळोवेळी आक्रमक भूमिका घेणारे शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांचे आज उपअभियंता जिपसाबां, पंचायत समिती संगमनेर येथे पुन्हा एकदा आक्रमक रूप बघायला मिळाले.
उपरोधिक सत्कार करण्यासाठी उपअभियंता जि. प. सा. बां. पंचायत समिती संगमनेर यांच्या कार्यालयात अधिकारी नसल्यामुळे संबंधितांची फोनवरून कानउघाडणी केली व त्यांच्याकडून तांत्रिक अडचणीमुळे पुढील आठ दिवसात काम सुरु केले जाईल असे सांगण्यात आले. व त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काळ्या कलरची शाल व बुके देऊन सत्कार केला.
शिव प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष शिवश्री गणेश श्रीराम शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे बिरेवाडी शाखा अध्यक्ष निलेश सागर बिरेवाडी शाखा उपाध्यक्ष तुषार ढेंबरे युवा नेते प्रकाश संतोष ढेंबरे युवा नेते राजेंद्र ढेंबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब यादव साहेब व पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब उपस्थित होते.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयातुन लवकरच रणखांब फाटा ते वरवंडी रोडचे काम तांत्रिक बाबी पुर्ण करुन सुरू होईल असे कळविण्यात आले आहे.
शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन व उपरोधिक सत्काराची दखल घेत सर्वच विभागांनी दिलेल्या टाईमलाईनमध्ये कामे पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पत्रात सांगितले आहे.