
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर – देगलूर तालुक्यातील मौजे करडखेड येथे अवैद्य व्यवसाय उतू आला असून
देशी व गावठी दारूचा सर्रास खुलेआम विक्री होत असताना दिसत आहे व मटका, गुटखा, जुगार, पेट्रोल डिझेल विक्री जोमात चालू असून प्रशासन मात्र कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. करडखेल येथील जिल्हा परिषद शाळेच्या आजूबाजूला हे अवैद्य धंदे चालू आहेत अवैद्यधंद्दे चालू असल्यामुळे तेथील जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतो वेळोवेळी पोलिसांना निवेदन देऊन कल्पना देऊन पण याकडे कानाडोळा करायचा काम तेथील पोलीस प्रशासन करत आहेत या अवैद्यधंदे माफियावर
बिट जमादाराचा हात आहे का कोणत्या बड्या नेत्याचा हात आहे अशी चर्चा त्या परिसरातील नागरिकां मध्ये सुरू आहे, यासाठी प्रशासने अवैद्यधंदे तात्काळ बंद करून त्या भागातील नवयुवकांचे भविष्य सुंदर करावे असे त्या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.