
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
देगलूर प्रतिनिधी: देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर साहेब यांची भेट घेऊन येणाऱ्या काळातील वाळू घाटा विषयी चर्चा करण्यात आली तालुक्यातील वाळू घाटाचा लिलाव झाला नसतानाही महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी घरून वाळू माफिया खुलेआम वाळूची तस्करी करीत आहेत. याबाबत व अन्य प्रश्नानाबाबत येत्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आ. जितेश अंतापूरकर यांनी दै. चालू वार्ता प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
देगलूर तालुक्यातील वाळू घाट बंद असताना या वाळू घाटावरून तहसीलदारांच्या आशीर्वादाने वाळू माफिया बिनधास्तपणे वाळूची तस्करी करीत आहेत तालुक्यातील वाळू घाटावरून अवैधरीत्या उत्खनन झाल्याचे ऑक्टोबरमध्ये उघडकीस आल्यानंतर संबंधीत अधिकाऱ्यांवर काय कार्यवाही झाली? सध्या दररोज रात्रीच्या वेळी चाळू घाटावरून तहसीलदार व तलाठी – पोलिसांच्या आशीर्वादाने वाळूची तस्करी होत आहे. याबाबत आपण येत्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणारअसल्याचे आ. जितेश अंतापूरकर यांनी सांगितले. देगलूर व
बिलोली तालुक्यातील पुनर्वसित गावांची यादी देवून पुनर्वसित गावात सिमेंट काँक्रिटचा रस्ता, नालीबांधकाम, विद्युतीकरण, सभागृह आदी विकास कामांचे अंदाजपत्रक सादर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला जानेवारी २२ मध्ये आदेश देवूनही संबंधीत अधिकाऱ्याने अंदाजपत्रक सादर केले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही काय करण्यात आली? याचा ग्रामविकास मंत्र्यांना जाब विचारणार असल्याचे आ. अंतापूरकर यांनी सांगितले. तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सिमेवर असलेल्या देगलूर तालुक्यातील खानापूर येथील औद्योगिक वसाहती(एमआयडीसी) मध्ये विविध उद्योग कार्यरत आहेत. मात्र एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग उभारण्यासाठी ७८ हेक्टर जमीन संपादित करण्याची मागणी अनेकवेळा केली. भुसंपादनाला का वेळ लागत आहे. ? याबाबत हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आ. अंतापूरक यांनी सांगितले. देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचबरोबर कमी व जास्त दाबाच्या वीजपुरवठ्याने रोहित्र व विजेची उपकरणे जळत आहेत. शेतकऱ्यांना व नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विभागीय आयुक्तालयाचे विभाजन करून नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यासाठी नांदेड येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत शासनस्तरावर काय चालू आहे व सीमा वरती भागातील देगलूर बिलोली मतदारसंघातील काही गावे हे तेलंगाना राज्यात समाविष्ट होण्यासाठी चाललेल्या घडामोडी याबाबत शासनाला जाब विचारणार असल्याचे आ. जितेश अंतापूरकर यांनी दै. चालू वार्ता प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.