
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :- राज्य सरकारने त्यांची विनंती मान्य करून देशात प्रथमच अपंग मंत्रालयाची स्थापना केली.अवघ्या २४ दिवसांत मुख्यमंत्र्यांनी अपंग मंत्रालयाला मंजुरी दिली,असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.१९९५ पासून या मागणीसाठी लढा सुरू होता.सध्या प्राथमिक टप्प्यात मंत्रालयासाठी ११०० कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे आणि लवकरच हा आकडा १० ते १५ हजार कोटींवर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या मंत्रालयाच्या माध्यमातून सर्व दिव्यांगांची सेवा करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.मंत्रालयामुळे खोक्यांना एकदम ओके उत्तर मिळालं अस त्यांनी बोलून दाखवलं.अचलपूर विधानसभा मतदारसंघात गेली २० वर्षे आमदार म्हणून कार्यरत असलेले बच्चू कडू यांना लाखो लोकांचा पाठिंबा लाभला असून लाखो लोकांच्या हृदयात ते राहतात.मंत्रिपदाचा मुद्दा उपस्थित करताना बच्चू कडू हे थेट म्हणाले की,मंत्रीपदाच्या प्रश्नाबाबत आमदार बच्चू कडू यांच्या भावना कधीच लपून राहिल्या नाहीत.यापूर्वीही त्यांनी या विषयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.त्यांनी आमदार रवी राणा यांच्या सोबत वाद होऊन प्रहार केला.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण कसेबसे संपले.मात्र, बच्चू कडू यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ अद्याप पडलेली नाही.आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांचा चेहरा उजळला.त्यांना अपंग मंत्रालयाचे मंत्रीपद मिळाले तर आनंदच होईल.शेवटच्या काळापर्यंत मंत्री म्हणून नाही तर सेवक म्हणून काम करणार,अशा विचारांनी त्यावेळी स्पष्टीकरण दिले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात शिवसेनेविरोधात बंडखोरी करून राज्यात सत्ता स्थापन केली त्यावेळी अपक्ष आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला होता.ज्यामध्ये अमरावती जिल्ह्याचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा मोठा सहभाग होता.आता आमदार बच्चू कडू यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार असल्याचे बोलले जात आहे.मात्र सत्ता स्थापनेपासून आत्तापर्यंत ते मंत्रीपदापासून दूर राहिले.मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांना संधी मिळाली नाही.त्यानंतर आपली बाजू लहान असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान,रवी राणा यांच्याशी झालेल्या वादानंतर आमदार बच्चू कडू यांनी अमरावती येथे झालेल्या सभेत आपली ताकद दाखवून दिली.राणा आणि कडू यांच्यात सर्व काही सुरळीत करण्याचा प्रयत्न झाला.आमदार बच्चू कडू यांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी देण्यात आला.अचलपूर मतदारसंघातील सापन प्रकल्पाला ४९५.२९ कोटींची सुधारित मान्यता देण्यात आली.परंतु ही परतीची भेट इथेच संपली नाही.आता ही मालिका दीर्घकाळ चालणार आहे,असा टोलाही आमदार बच्चू कडू यांनी लगावला आहे.