
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – पैठण येथील एका कार्यक्रमा दरम्यान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मविर भाऊराव पाटिल , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले यांनी भिक मागुन शाळा उघडल्या , असे बेजबाबदार वक्तव्य करून समाजाच्या व देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या असुन राज्यभरात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न व महापुरुषांचा अवमान भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला असुन त्यांच्यावर कार्यवाही करून तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विविध संघटना व लोहा येथील संदिप राजकोर, छगन हटकर अभिजीत महाबळे गजानन कराडे विक्की खाडे किरण राठोड रुद्रा मेहरकर मनोज निखाते अर्जुन महाबळे सोमेश खरात सद्दाम शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.