
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड :- जिल्हाधिकारी साहेबांच्या सक्त आदेशानुसार एस.बी.आय. बँकेने गेल्या १०दिवसापासून चालू असलेले आमरण उपोषणकर्ते बंडू खंडेराव तालीमकर रा.कबनूर ता.मुखेड जि.नांदेड यांची मागणी मान्य केली आहे
संघर्षाचा विजय झाला आहे.
एस.बी.आय. बँक म्हणत होती कर्ज देणारच नाही दिले तरी ५% लाचेची मागणी केली होती.
परंतु बंडु तालीमकर यांच्या संघर्षामुळे व माननीय नांदेड जिल्हाधिकारी साहेब यांच्या मध्यस्थीमुळे शेवटी बँकेनी कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे.त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे.जिल्हा अग्रणी बँकेने लेखी पत्र देऊन कर्ज देण्याचे मान्य केले आहे.या उपोषणाला बऱ्याच लोकांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या सहभाग राहिला आहे विशेष म्हणजे मास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाई सूर्यवंशी साहेब व मास चे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत तादलापूरकर साहेब यांच पण या मध्ये खूप मोठ योगदान आहे तसेच दैनिक चालू वार्ता चे पत्रकार यांनी सहकार्य करून खुप मोठे योगदान दिले आहे.सर्वाचे आभार मानतो असे उपोषणकर्ते यांनी म्हटले आहे.शेवटी संघर्ष केल्यावर निश्चित न्याय मिळतो असे त्यांनी म्हटले आहे.