
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा शहरालगत नानसी पुनर्वसन येथे मंगळवार दि. ६ डिसेंबर रोजी
दिवसा दुपारी घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह सव्वा दोन लाख रुपयाच्या ऐवज लंपास केला आहे.नानसी पुनर्वसन येथील जयश्री गजानन बादाडे या मंगळवारी धार्मिक कार्यक्रमासाठी घराबाहेर
गेलेल्या असता दुपारी चोरट्याने त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडला. त्यानंतर घरातील कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून सव्वा दोन लाख रुपयाचा ऐवज लंपास केला. शिवाय कपाटातील वारसा हक्क प्रमाणपत्र, जागा खरेदी कागदपत्र, विम्याच्या पावत्याही चोरुन नेल्या आहेत. याप्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.