
दैनिक चालू वार्ता राजगुरूनगर ता. प्रतिनिधी-मयुरी वाघमारे
==========================
राजगुरूनगर-: राजगुरूनगर ता. खेड, जि. पुणे
दि :-11/12/2022 आज रविवार रोजी हुतात्मा राजगुरू राष्ट्रीय स्मारक ( राजगुरू वाडा ) राजगुरूनगर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. थँलेसेमिया आजार असलेल्या काही लहान मुलांना प्रत्येक 15 ते 20 दिवसांनी रक्ताची गरज लागते. हा आजार असलेल्या मुलांना चा शरीरात रक्त तयार होत नाही. त्यामुळे त्यांना प्रत्येक 15 ते 20 दिवसांनी रक्त उपलब्ध करून द्यावे लागते. जर त्यांना रक्त वेळेवर उपलब्ध करून नाही दिले तर त्यांचा जीवावर ते बेतू पण शकत. या थँलेसेमीया असा आजार असलेल्या मुलांसाठी लढा रक्तदान ह्या मोहिमे आंतर्गत आपण या वेळी रक्तदान शिबीर सकाळी 9 ते 5 या वेळेत घेतं आहोत जाणीव परिवार या संस्थेमार्फत रकदात्यांच्या मदतीने एकत्रित रक्ताचा साठा उपलब्ध करून देऊन या लहान मुलांना साठी काही महिन्यांची रक्ताची ओढाताण कमी करण्यात येईल.
अशी माहिती जाणीव परिवार चे अजिंक्य बकरे यांनी दिली.
विशेष सहकार्य:- सीने अभिनेते संदीप पाठक फॅन क्लब.