
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
यशवंत भीमराव आंबेडकर ( जन्म १२ डिसेंबर १९१२ – मृत्यू १७ सप्टेंबर १९७७), भैय्यासाहेब आंबेडकर या नावाने भारतभर सामाजिक, राजकीय, कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते म्हणून सुपरिचित आहे. भैय्यासाहेब आंबेडकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे प्रथम एकमेव पुत्र होय. असं म्हणतात की विशाल पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली दुसरे कोणतेच झाड उगवत नाही किंवा वाढत नाही. म्हणजेच एका थोर महापुरुषाच्या कुटुंबात दुसरा महापुरुष जन्माला येऊ शकत नाही . मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस म्हणून भैय्यासाहेब आंबेडकर यांनी समाजात स्वतःचे स्वातंत्र्य व्यक्तिमत्व निर्माण केले. बाबासाहेब च्या एवढे त्यांचे व्यक्तिमत्व जरी असामान्य नसले तरी त्यांच्या शांत, संयमी सहनशील आणि वैचारिक बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी बाबासाहेबांचं कार्य पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. भैय्यासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण हे मुंबईमध्येच झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर यशवंतरावांनी म्हणजेच भैयासाहेब आंबेडकरांनी स्वतःला धम्मकार्यासाठी झोकून दिले. आणि बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचे काम वेगाने भारतभर सुरू ठेवले. १९ एप्रिल १९५३ रोजी त्यांचे लग्न मिराबाई यांच्यासोबत झाले. बाबासाहेबांचे अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी भैय्यासाहेबांनी बाबासाहेबांच्या चळवळीच भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतभूषण प्रिटींग प्रेस हा छापखाना सुरू केला .पुढे या प्रेसचे बुद्धभूषण ग्रीटिंग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या जनता, प्रबुद्ध भारत या मुखपत्राचे व्यवस्थापन तेच पाहत होते .बुद्धभूषण प्रेस मध्ये बाबासाहेबांचा “थॉट्स ऑन पाकिस्तान” हा इंग्रजी ग्रंथ भैय्यासाहेबांनी छापला होता. बाबासाहेब यांच्या सूचनेवरून त्यांनी वा .गो. आपटे लिखित “बौद्ध पर्व” हा ग्रंथ ही आपल्या छापण्यात छापून प्रसिद्ध केला. पुढे डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भारतीय बौद्ध महासभेतर्फे दादासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एका मताने भैयासाहेब आंबेडकर यांची भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सामाजिक एकता टिकून राहावी म्हणून तरुण भैय्यासाहेबांनी संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रभर दौरा केला व संपूर्ण भारतभर बुद्ध धर्मांतराच्या मोठ्या सभा घेतल्या ग्रामीण भागात बुद्धविहाराची निर्मिती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली संघटना कमकुवत होऊ नये म्हणून भैय्यासाहेबांनी आपल्या शारीरिक व्याधीकडे दुर्लक्ष करून जीवाची बाजी लावून समाजासाठी अहोरात्र कार्य केले. सन १९६८ मध्ये भारतीय बौद्ध महासभेचे भारतातील पहिले राष्ट्रीय अधिवेशन मुंबई येथे भरवले या अधिवेशनाला प्रमुख अतिथी म्हणून बौद्धांचे धर्मगुरू दलाई लामा यांना निमंत्रित केले. बाबासाहेबांची गाव खेड्यात अनेक बुद्ध विहार ,पुतळे उभी राहिली कारण बाबासाहेबांवर जनतेची अपार श्रद्धा होती. परंतु मुंबई येथे चैत्यभूमीच्या नावाने उभारण्यात येणारे भव्य स्मारक पूर्ण होत नव्हते. निधी पाहिजे त्या प्रमाणात गोळा होत नव्हता हे ओळखून भैय्यासाहेबांनी लोकांना चैत्यभूमीच्या निर्मितीसाठी भरीव निधी द्या !असे आवाहन केले ती जबाबदारी भैय्यासाहेबांनी आपल्या खांद्यावर घेतली त्यासाठी त्यांनी मध्य प्रदेशातील बाबासाहेबांचे जन्म ठिकाण “महू” गावापासून चळवळीतील आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन भव्य “भीमज्योत” पदयात्रा काढली मध्य प्रदेशातून नागपूर ,पुणे मार्गे मुंबईला ही भीमज्योत आणली या प्रवासात जो निधी मिळाला त्या निधीतून बाबासाहेबांचे दादरच्या चैत्यभूमीवर मोठे स्मारक बांधले म्हणून भैय्यासाहेबांना “चैत्यभूमीचे शिल्पकार ” असे म्हटले जाते. भैय्यासाहेबांनी केलेल्या अपार कष्टामुळेच देशभरामध्ये भारतीय बौद्ध महासभा ,समता सैनिक दलाचे कार्य आज रोजी टिकून आहे, आज बाबासाहेबांच्या नावाचा, संघटनांचा, पक्षाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून स्वतःचा सार्थ साधून घेण्यात अनेक जण गुंतलेले आहे .जर एक वारसा म्हणून भैय्यासाहेबांनी बाबासाहेबांच्या नावाचा वापर केला असता तर त्यांना हवं ते राजकीय पद मिळू शकले असते. मात्र भैय्यासाहेबांनी तसं न करता अतिशय साधं आयुष्य ते जगले बौद्धाचार्याचे जनक …भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय…
अध्यक्ष विश्वरत्न बाबासाहेबांच्या विचाराचे एकनिष्ठ सूर्यपुत्र यशवंत तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती आणि कार्याला विनम्र अभिवादन…
सिद्धार्थ अशोक तायडे
मु. पो. वडनेर भोलजी
ता. नांदुरा
जि. बुलढाणा
मो. नं.9309767388