
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
हल्ली दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र मध्ये सगळीकडे एकच प्रकरण चर्चा चालू आहे. ते म्हणजे माननीय मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावरती फेकलेली शाई, आता येथे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पहिला प्रश्न म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी केलेलीचूक ही त्यांनी माध्यमातून प्रकटपणे कबूल केली होती का? तर याचे उत्तर येतं ते नाही. त्यांनी माध्यमाच्या समोर स्पष्टीकरण दिलं होतं नक्की पण स्पष्टपणे दिलगिरी व्यक्त केली नव्हती. थोर पुरुषाबद्दल बोलत असताना चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या विचारवंत नेत्यांनी विचार करून बोलायला नको का ? आणि हल्ली गेल्या महिन्याभरामध्ये भाजपच्या नेत्यांनी जो महापुरुषाचा केलेला अपमान त्यातल्या त्यात राज्यपाल महोदयांनी वारंवार म्हणजेच दोन महिन्यात तीन वेळा विचारलेले अपशब्द आणि तिसऱ्या वेळी राज्यपाल महोदय यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेला अपमान जनक वक्तव्य हे महाराष्ट्र अजून विसरलेला नाही. तेवढ्यातच पाटला सारख्या शहाण्या नेत्यांनी पुन्हा महापुरुषाचा अपमान करणे योग्य आहे का? तर याचे उत्तर त्यांनीच द्यावं.
भाजपच्या काही नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वरती शाही फेक झाल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने मध्यमसमोर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. त्यावर सर्वांचे म्हणणे हेच होतं की हे काही घडलेलं आहे. ते पाटलांकडून चुकून घडलेला आहे. त्याचं त्यांनी वेळोवेळी म्हणजेच माध्यमाद्वारे दिलगिरी व्यक्त केल्याचा त्यांनी बोलला आहे.
पण मला एक गोष्ट कळत नाही. जर चंद्रकांत पाटील यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल आदर होता, यांच्या बद्दल त्यांना पूर्णपणे माहिती होती. तर त्यांनी जो शब्द विचारला तो शब्द कितपत योग्य आहे? यावरही विचार करणं गरजेचं आहे.
माननीय चंद्रकांत पाटील यांच्यावरती शाही फेक झाली. आम्ही बिलकुल समर्थन करत नाही. निषेध करण्याचे अन्य पद्धती असू शकतात. शाई फेकून निषेध करणे हे नक्कीच चुकीच आहे.
हा शाही फेक चा प्रकार घडल्यानंतर त्याच दिवशी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना चांगलाच वचपा काढलेला दिसला. साहजिक आहे राग येणारचं ना, कारण महाराष्ट्राच्या जनतेसमोर तोंड काळ होणे हे काय बरोबर नाही. पण ज्यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्याची स्थापना केली, आज ज्यांच्यामुळे आपण ताट मानेनी समाजामध्ये जगत आहोत. महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहेत . असा महान आमचं दैवत आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल , ज्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोसारी यांनी अपमान जनक वक्तव्य केलं. आणि त्यांना पाठीशी घालण्याचं काम भाजपच्या नेत्यांनी केलं हे योग्य आहे का चंद्रकांत दादा पाटील?
मग त्यावेळेस तुम्ही कुठे गेला होतात? तुमच्या अंगावरती शाई फेकली, त्या लोकांना तात्काळ अटक झाली. संरक्षणाला असलेल्या पोलिसांचे निलंबन झालं, तिन्ही आरोपी वरती पोलिसाकडून चुकीच्या कलम लावल्या गेल्या, दादा मग हा कायदाचा गैरवापर तर होत नाही ना? असा प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. याचे उत्तर पण आज ना उद्या तुम्हाला द्यायचा आहे. कारण राज्यात आणि केंद्रात आपली सत्ता आहे.
पुन्हा मी सांगतो शाही फेकली, तेही प्रतिष्ठित मंत्र्याच्या अंगावरती या गोष्टीचा मी संपादक म्हणून नक्कीच समर्थन करत नाही. पण त्याच्या अगोदर घडलेल्या घटना आणि नंतर घडलेल्या घटना ह्या लोकशाहीला धरून किंवा घटनेला धरून नाहीत हे पण मी ठामपणे सांगायला विसरत नाही.
आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाहीत का? मानत असाल तर मग राज्यपालांनी केलेल्या अपशब्द वरती आपण आतापर्यंत काही प्रतिक्रिया का नाही दिली? हा प्रश्न आज मी नाहीतर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र विचारत आहे दादा, याचं उत्तर तुमीच द्यावं राज्यपाल मोहदयवरं कारवाई करून असी अपेक्ष्या आता आपल्यकडून जनतेची आहे.