
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहरातील जुना लोहा येथील अत्यंत गरीब कुटुंबातील लक्ष्मीकांत कहाळेकर हा विद्यार्थी जिद्द, मेहनत,व कठोर परिश्रमाच्या जोरावर रात्र-न- दिवस अभ्यास करून वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या एमबीबीएससाठी पात्र ठरून जळगाव येथील शासकीय एमबीबीएस काॅलेजला प्रवेश मिळाला परंतु घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असुन वडीलाचे क्षेत्र हरवले आहे आई शिवणकाम करून घर चालविते लक्ष्मीकांत कहाळेकर हा एमबीबीएससाठी पात्र ठरल्यामुळे त्याला पुढील शिक्षणासाठी आर्थिक चणचण भासत असल्यामुळे त्याला आझाद ग्रुप च्या वतीने आर्थिक हात म्हणून करा म्हणून आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा यांनी आझाद ग्रुपच्या वतीने ११ हजार रुपयांची मदत जाहीर करुन दि. १२ डिसेंबर रोजी आझाद ग्रुपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा दिपक रायफळे व आझाद ग्रुपचे लोहा तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोसकर, यांच्या हस्ते लक्ष्मीकांत कहाळेकर यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करुन रोख ११ हजार रुपये दिले. यावेळी हळदवचे माजी सरपंच भीमराव पाटील शिंदे, दैनिक चालु वार्ताचे उपसंपादक गोविंद पाटील पवार युवा नेते बाळु पा गवते , रूबाब ड्रेसेसचे अनिकेत भैय्या सुरनर , नागेश पा लोंढे ,अजय पवार , प्रसाद पोले उपस्थित होते.
लोकहित सर्वतोपरी हे ब्रीद वाक्य घेऊन सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य,आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी व गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व त्यांची आझाद ग्रुप ही सामाजिक संघटना असुन लोहा शहरातील गरीब कुटुंबातील अत्यंत हुशार व होतकरू विद्यार्थी
लक्ष्मीकांत कहाळेकर यांचा लक्ष्मीकांत कहाळेकर एमबीबीएच्या शिक्षणासाठी पात्र ठरला पंरतु त्यांना शिक्षणासाठी आर्थिक चणचण भासत होती पैशाअभावी त्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून अनेक दानशूर व्यक्ती हे आर्थिक मदत करीत आहेत त्यांचाच एक भाग म्हणून आझाद ग्रुपच्या वतीने लक्ष्मीकांत कहाळेकर यांचा सत्कार करुन त्यांना रोख ११००० रूपये मदत देण्यात आली
तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी व अनेक श्रीमंत असलेले व्यापारी, सरकारी नौकरदार , लोकनिनिधी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासुन एमबीबीएससाठी पात्र ठरलेल्या व भावी डॉक्टर असलेल्या लक्ष्मीकांत कहाळेकर यांना जमेल तशी आर्थिक मदत करावी असे आवाहन आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांनी केले आहे.