
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
पिकावरील मोठया अळया वेचून त्यांचा नाश करावा. इग्रंजी ‘टी’ ‘T’ अक्षराच्या आकाराचे २० पक्षी थांबे प्रति एकर लावावेत.पिकास फुले येत असताना सुरुवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची / अझाडीराक्टीन ३०० पी[पीएम ५० मिली प्रति १० लिटर पाणी फवारणी करावी.घाटेअळीसाठी
क्विनॉलफॉस २० टक्के २० मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा क्लोरनॅट्रानीलीप्रोल १८.५ एससी 3 मिली किंवा नोव्हाल्यूरॉन ५.२५ % + इन्डॉक्झाकार्ब ४.५ % एससी १७ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
डॉ. कृष्णा अंभुरे
विषय विशेषज्ञ – पीक संरक्षण
कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी