
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
पुणे दि. महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील या थोर महापुरुषांच्या बद्दल मागील काही दिवसापासून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे नेते आणि मंत्री सातत्याने चुकीचे वक्तव्य करून त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत तसेच राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या चुकीच्या धोरणात विरोधात महाविकास आघाडीचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आधी नेत्यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक १७ डिसेंबर रोजी मुंबई येथे हल्लाबोल आंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा बहुजन जनता दर संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी महाविकास आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांची भेट घेऊन व चर्चा करून हल्लाबोल आंदोलन मोर्चाला बहुजन जनता दलाचा पाठिंबा दर्शवण्यासाठी चर्चा केली आहे तेव्हा राज्यातील बहुजन जनता दलाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी व सर्व आघाड्यांच्या अध्यक्षांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
राज्यकर्त्यावर जनतेचा विश्वास नसल्यामुळे महाराष्ट्राच्या सिमेलगत असलेली अनेक गावे बाजूच्या राज्यात जाण्याची तयारी व भाषा बोलत आहेत सांगली जिल्ह्यातील अनेक गावांनी कर्नाटक राज्यात जाण्याबाबत उघडपणे भूमिका घेतली आहे ही भूमिका अत्यंत दुर्दैवी व चिंताजनक बाब असून यासंदर्भात राज्य शासनाने स्पष्ट भूमिका दिसून येत नसल्याने राज्यातील जनतेच्या मनात तिव्र असंतोष निर्माण झाला आहे आणि आशिया खंडातील मुंबई येथील सर्वात मोठी धारावी झोपडपट्टी उध्वस्त करून ही जागा भाजपाचे उद्योगपती अंदानी यांना बक्षीस म्हणून दिली आहे त्यामुळे १० लाख पेक्षा जास्त नागरिक विस्थापित होणार असून या ठिकाणचा संपूर्ण रोजगार उध्वस्त होणार आहे यासर्व बाबींच्या विरोधात महाविकास आघाडीने शनिवार दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वा मुंबई येथील भायखळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनल्स पर्यंत हल्लाबोल आंदोलन मोर्चा काढण्यात येणार आहे या हल्लाबोल आंदोलन मोर्चा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत
बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या आदेशानुसार हल्लाबोल आंदोलन मोर्चा राज्यातील बहुजन जनता दल कार्यकर्ते व पदाधिकारी आणि सर्व आघाडीच्या जिल्हाप्रमुखांनी मोठ्या संख्येने या हल्लाबोल आंदोलन मोर्चा सहभागी व्हावे असे आव्हान बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे.दिपक पाटील आनंद गजभिये महेंद्र इंगळे धनराज पाटील . किशोर राऊत सुनील पाटील राजेंद्र गायकवाड सुनिता राऊत कमलाबाई ओगले संगिता भुरे वच्छला शेळके ज्योती लांजेवार प्रिया जाधव हिम्मत पाटील शामराव शिंदे दादासाहेब तोरणे शांताराम यवतकर दिपक कांबळे विशाल माने किशोर कदम याकुब शाहा महेंद्र इंगळे धनराज माने यांच्या सह अनेक बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे असे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविलेले आहे