
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
तालुक्यातील हरबळ येथील दत्त मंदिर सभागृह बांधकाम 10 लक्ष रुपये व ग्रामपंचायत अंतर्गत सीसी रस्त्याचे काम 2.50 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन शेकापचे मराठवाडा सहचिटणीस तथा युवा नेते विक्रांत दादा श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते काल गुरुवार दि. 29 रोजी करण्यात आले, यावेळी हरबळ गावकऱ्यांच्या वतीने विक्रांत दादा श्यामसुंदर शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला ,यावेळी बोलताना विक्रांत दादा शिंदे म्हणाले की हरबळ गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मी या भागाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून सदैव कटिबद्ध असून येणाऱ्या काळात हरबळ गावातील विविध प्रलंबित विकास कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी आमदार शामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून निधीची कसलीही कमतरता भासू देणार नसून हरबळ गावच्या विकासासाठी आम्ही आ. शिंदे कुटुंबीय सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी बोलताना विक्रांत दादा शिंदे यांनी स्पष्ट केले, हरबळ ग्रामस्थांनी गावातील गणपती मंदिर व दत्त मंदिर येथे नवीन पाण्याचे बोअर व पाण्याची टाकीची व्यवस्था करण्याची मागणी केली असता विक्रांत दादा शिंदे यांनी हरबळचे सरपंच तथा शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे यांना नवीन बोअर व पाण्याची टाकी उभारण्यासाठी तात्काळ उ निधी उपलब्ध करून दिल्या जाईल असे विक्रांत दादा शिंदे यांनी यावेळी हरबळ ग्रामस्थांना आश्वासन दिले, यावेळी कार्यक्रमाचे आयोजक सरपंच तथा शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे हरबळकर, जिल्हा परिषद चे अभियंता शिवाजी राठोड, नामदेव पाटील शिंदे, शंकर पाटील शिंदे, गजानन मोरे, अशोक सोनकांबळे, सह गावकरी, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.