
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा.तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यातील मेंढपाळ, दाखल झाले असून त्यांचे शेत शिवारात सर्वत्र कळप दिसत आहे. शेतीची सुपीकता वाढविण्याकरिता शेतकरी नविन प्रयोग करत आहे. सततची नापीकीवर मात करण्यासाठी आणी शेतात उत्तम दर्जाचे चांगले उत्पन्न येण्यासाठी, मेंढया, शेळ्या शेतात बसविण्यात शेतकरी प्राधान्य देतांना दिसत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्याकडे पशुधन कमी झाल्याने शेण खताचे प्रमाण फार कमी झाल्याने
सध्या शेणखत आणि रासायनिक खताच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. शेणखताचा वापर शेतीत जास्त प्रमाणात होत नसल्याने शेतीची सुपीकता नष्ट होत चालली आहे. सुपीकता वाढविण्यासाठी शेणखताची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकरी आता शेळी, मेंढी मालकांना काही मोबदला देवून शेतामध्ये शेळया मेंढया बसवित आहे. दिवसे दिवस शेतीत पिकांचे उत्पादन काढण्याकरिता रासायनिक खताचा अतीवापर केल्या जात आहे. त्यामुळे शेत जमिनीची पोत मोठ्या प्रमाणात खालावत चालली आहे. काही शेतकऱ्यांची शेतजमीन नापीकी होण्याच्या मार्गांवर दिसत आहे.