
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- शासनमान्य पत्रकार संरक्षण समितीचे पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सोमनाथ टोकरे यांनी पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांची भेट घेऊन ग्रामीण भागात आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा व विकास कामांचे निवेदन देऊन सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.या निवेदनात टोकरे यांनी महात्मा गांधीजींनी दिलेल्या “खेड्यांकडे चला” हा मूलमंत्र घेऊन देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात तरी ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चांगले रस्ते,आरोग्यविषयक सुविधा,शैक्षणिक दर्जा,कृषी आणि रोजगाराच्या संधी,दळणवळण आणि पिण्याचे सुद्धा पाणी यासारख्या सुविधा ग्रामीण जनतेला मिळायला हव्यात अशी मागणी त्यांनी या निवेदनामार्फत जिल्हाध्यक्षांकडे करून विकासाच्या मुख्य प्रवाहात ग्रामीण भागातील आदिवासी बांधव कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान जव्हार सारख्या शहराला ऐतिहासिक राजघराण्याचा वारसा लाभला असून जव्हारला पर्यटनाचा “ब” दर्जा प्राप्त असल्याने नेहमी जव्हारकडे पर्यटकांची गर्दी पहावयास मिळते.त्या दृष्टीने पर्यटन स्थळे विकसित करणे ही काळाची गरज असल्याचा सुतोवाच त्यांनी यावेळी केले.यावेळी मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ,बाळासाहेबांच्या शिवसेनेचे विक्रमगड तालुकाध्यक्ष सागर आळशी,हनुमान माळगावी उपस्थित होते.