
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -राम पाटील क्षीरसागर
लोहा तालुक्यातील आडगाव येथे केंद्रस्तरीय संमेलन संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनेगाव बिटच्या विस्तार अधिकारी श्रीमती सरस्वती आंबलवाड मॅडम होत्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख श्री मदन नायके सर, ग्रामपंचायत आडगावचे सरपंच प्रतिनिधी मंगेश पाटील क्षीरसागर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री पत्रकार राम पाटील क्षीरसागर , श्री मेघाजी र्पाटील क्षीरसागर, उपाध्यक्ष दिलीप धनसडे विठ्ठल होळगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नुकताच नांदेड येथे झालेल्या निबंध स्पर्धेत जिल्ह्यातून पहिला क्रमांक आलेली प्रतिभा दिलीप धनसडे या विद्यार्थिनीचा श्रीमती आंबलवाड मॅडम त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच अजित विश्वंभर क्षीरसागर यांनी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अवल गुण मिळवल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गोणारे सर व सूत्रसंचालन कदम सर यांनी केले आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर यांनी केले यावेळी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते तर आडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव येथील सर्व शिक्षक स्टॉप यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला